Raj Thackeray/Jitendra Awhad Saam TV
मुंबई/पुणे

जे राम मंदिर बोलतात, त्यांच्यावर 'राम नाम सत्य है' बोलण्याची वेळ येऊ नये - जितेंद्र आव्हाड

भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार वागावे लागेल. राज ठाकरे यांना अमेरिकेच्या CIS ची सुरक्षा मिळू द्या मला काही करायचे नाही. देशातील प्रत्येक नागरिकाने महागाईवर बोलायला हवे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जे राम मंदिर बोलतात, त्यांच्यावर राम नाम सत्य है. बोलण्याची वेळ येऊ नये असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावलाय. आव्हाडांनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, 'महागाई कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी वेगवेगळ्या बातम्या तयार केल्या जात आहेत. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या नियमानुसार वागावे लागेल. राज ठाकरे यांना अमेरिकेच्या CIS ची सुरक्षा मिळू द्या मला काही करायचे नाही. देशातील प्रत्येक नागरिकाने महागाईवर बोलायला हवे. कोणी अयोध्याला गेला काय काही फरक पडत नाही. आम्हाला काहीही घेणे देणे नाही. आम्ही महागाईवर बोलतो. जे राम मंदिर बोलतात त्यांच्यावर राम नाम सत्य है बोलण्याची वेळ येऊ नये असही आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

तसंच मागच्या मार्च मध्ये महागाई (Inflation) दर ७.२ वर होता, तो आता १४ पर्यंत गेला आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. आमच्या सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र, आज मध्यम वर्गीय व्यक्तीला महागाई विषयी विचारा किती महागाई झाली आहे. उन्हाचे चटके कमी तर महागाईचे चटके अधिक बसत आहेत अशी टीका त्यांनी केंद्रावर केली.

हे देखील पहा -

दरम्यान, हिंसा ही कशीही असो ती समाजाच्या विरोधात असते. देशात जे सुरू आहे त्यामुळे देशाचा म्यानमार, अफगाणिस्तान झाल्या शिवाय राहणार नाही. अमेरिकेत भारतीय आहेत तेथे धर्म कधी मध्ये येत नाही. राज ठाकरे यांना धमकी आली असेल. तर मला माहित नाही माझ्यासाठी हा नॉन इश्यू आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर बोलूया मी ही आयोध्यला जाणार आहे. खंडोबाला जातो. देवाला जातांना सांगायचे नसते असही ते म्हणाले,

तर नितेश राणे (Nitesh Rane) माझे मित्र आहेत. मी जे भूमिका घ्यायचो ती भूमिका ते घ्यायचे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात ही नितेश राणे भूमिका घ्यायचे. नया दिन आता है नया सूरज आता है असा टोला त्यांनी राणेंनाही लगावला. शिवाय़ राजकारणात धमकी सगळ्यांना येत असतात. बाळा नांदगावकर हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना चांगले ओळखतात. सुरक्षा द्यायची की नाही ठरवतील असंही आव्हाड म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

SCROLL FOR NEXT