हॉटेल आणि बार रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार!
हॉटेल आणि बार रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार! अजय दुधाने
मुंबई/पुणे

हॉटेल आणि बार रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार!

अजय दुधाने

अंबरनाथ - ठाणे Thane जिल्ह्यात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर जिल्ह्यातील हॉटेल Hotel आणि बार Bar रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे नवीन आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. १५ ऑगस्ट पासून हे नवीन आदेश लागू होतील.

हे देखील पहा -

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत दुकानं रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवायला परवानगी दिली होती. मात्र हॉटेल आणि बार यांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच होती. त्यामुळे हॉटेल ओनर्स असोसिएशनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

४ वाजेपर्यंतची वेळ ही हॉटेल आणि बार यांच्यासाठी अतिशय गैरसोयीची असून आमच्याकडे येणारे ग्राहक हे प्रामुख्यानं संध्याकाळी येत असल्यामुळे आम्हाला वेळ वाढवून द्यावी किंवा संध्याकाळचीच वेळ द्यावी, अशी मागणी हॉटेल ओनर्स असोसिएशनने केली होती. अखेर या मागणीची दखल घेत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी केले असून आता हॉटेल आणि बार सुद्धा रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवायला परवानगी देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Patil : मराठी माणसांवर हल्ले करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले, हे दुर्भाग्य : नरेंद्र पाटील

Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

SCROLL FOR NEXT