- परमबीरसिंग Saam Tv
मुंबई/पुणे

परमबीरसिंग नक्की आहेत तरी कुठे?

होमगार्ड विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग अद्याप हजर झालेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंडिगढ येथील त्यांचे राहते घरही बंद आहे

सूरज सावंत

मुंबई : होमगार्ड Home Guard विभागाचे महासंचालक DGP म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग Parambir Singh अद्याप हजर झालेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंडिगढ Chandigadh येथील त्यांचे राहते घरही बंद आहे. त्यांचा फोनही बंद आहे. त्यामुळे परमबीरसिंग नक्की आहेत कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. Home Guard DG Parmbir Singh not reachable

परमबिर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे FIR नोंदवण्यात आले आहेत.यातील ३ गुन्हे वसूलीचे तर १ गुन्हा अँट्रोसिटीचा आहे. परमबीरसिंग हे डीजी होमगार्ड नियुक्त झाल्यानंतर लगेचचं सुट्टीवर गेले ते अद्याप हजर झालेले नाहीत. त्यांच्या वकिलानी ते चंदीगढला असल्याचे सांगितले होते. सरकारकडून Maharashtra Government परमबीर यांच्याशी पत्र व्यवहार केला असता, त्यांनी त्यांच्यावर शस्त्र क्रिया केली जाणार असल्याचे सांगत मेडिकल कागदपत्रे पाठवली.

मोहरम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्डचा सहभाग महत्वाचा असतो. या विभागाचा चार्ज हा परमबीरसिंग यांच्याकडे असून ते अद्याप हजर झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने सिंग यांच्या चंडिगढ येथील घराच्या पत्त्यावर दोन वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र कोणतही उत्तर आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईचा माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेचा 'एक नंबर बाॅस' परमबीरसिंगच असल्याचं समोर आलं आहे. परमबीरसिंग यांच्या विरोधात गोरेगाव येथे दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. परमबीरसिंग यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात आणखी एका वसूली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंग यांच्यासोबत सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांची नावे देखील या गुन्ह्यात समोर आली आहेत. हा गुन्हा बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने नोंदवला आहे. Home Guard DG Parmbir Singh not reachable

परमबीरसिंग यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर हाॅटेल कलेक्शन, बार कलेक्शन सुरु झाले. तसेच बुकींना खुलेपणाने धंदा करण्याचीही वाझेने हमी दिली होती. हप्ता दिल्यास दुबईला जाऊन बुकीचा व्यवसाय करण्याची गरज नाही, असे वाझेने त्यांना सांगितले होते. कोरोनाच्या काळात नुकसान झाल्याने या सर्वांना मिळून दिवसाचे दोन कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते, असेही तक्रारीतून उघड झाले आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT