महावितरणला कोणी शॉक दिला... रोहित पवार का राम शिंदे

Rohit pawar and Ram Shinde
Rohit pawar and Ram ShindeSaam Tv

अहमदनगर : कर्जत तालुक्यात राजकीय कुरघोडी सुरू आहे. हा मतदारसंघ आमदार रोहित पवारांना आयडिल करायचा आहे. तर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे आणि सोशल मीडिया टीम ही घोषणा किती पोकळ आहे, हे दाखवून देत आहेत. कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे त्याचा पुन्हा प्रत्यय आला.

तेथील लोकं सांगतात, आम्हाला वीज असून अंधारात रहावे लागते. रॉकेल मिळत नाही. वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी थेट माजी मंत्री राम शिंदे यांनाच या प्रश्नात लक्ष घालण्याचे सांगितले. Dispute between Rohit Pawar and Ram Shinde over credit for work in Karjat

Rohit pawar and Ram Shinde
रोहित पवारांच्या गळाला भाजपचा मोठा नेता

त्यांना गावात बोलावून घेत कैफियत मांडली. तुम्ही मंत्री होता तेव्हा वेगळी गोष्ट होती, आता बिल भरूनही वीज मिळत नाही, असे ग्रामपंचायत कार्यालयात सांगितले.

यावेळी सरपंच राजू हिरभगत, जयदीप शिंदे, कल्याण नवले, संभाजी लोंढे, अशोक लोंढे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, दत्ता गोसावी, सुनील काळे, तात्यासाहेब माने, सोमनाथ कोल्हटकर, जयदीप शिंदे, अशोक डिसले, राहुल सरकाळे, नाना जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. Dispute between Rohit Pawar and Ram Shinde over credit for work in Karjat

ग्रामस्थांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर राम शिंदे यांनी तेथूनच महावितरणच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करा नाही तर मी आंदोलनाला बसेन, असे सांगताच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेब माने यांनी प्रास्ताविक केले. संभाजी लोंढे यांनी आभार मानले.

ट्विस्ट अभि बाकी है...

या बैठकीनंतर सरपंच राजू हिरभगत यांनी पत्रकारांना फोन करून सांगितले, की आमच्या गावाच्या विजेचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी लक्ष घातल्याने कालच सुटला आहे. आमदार पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाठवून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे नेमके काय आणि कोणामुळे शॉक बसला, हे वीजकर्मचारीच जाणोत.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com