Dilip Walse Patil Saam Tv News
मुंबई/पुणे

केंद्रीय यंत्रणांच्या नावे राज्यातील यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: राज्यातील प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्रत रचत असेल तर त्याची चौकशी केली जाईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती. गृहमंत्र्यांनी ती मान्य करीत चौकशीची घोषणा केलीये.

राज्याच्या पोलीस (Police) दलातील सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसुली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले. या कारवाईचे स्वागत करताना भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका गंभीर बाबीकडे आज विधानसभेत (Vidhansabha) सरकारचे लक्ष वेधले.

या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या (Central Agency) नावाचा वापर करुन वसुली तर करीत नाही ना, केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना, त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसुली तर करीत नाही ना, त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT