Chhota Rajan News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मालाडमध्ये फलकबाजी, सहा जणांवर गुन्हा दाखल

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाड परिसरात फलक लावण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chhota Rajan News : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाड परिसरात फलक लावण्यात आले होते. हा प्रकार पोलिसांना समजतात कुरार पोलिसांनी ते बॅनर उतरवून बॅनर लावणाऱ्या 6 व्यक्तींविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधित कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सी.आर. सामाजिक संघटनेच्यावतीने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्ताने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भातील फलक देखील या परिसरात लावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांसह इतरांवर गुन्हे दाखल करून काहींना ताब्यात घेतले.

छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त १४ आणि १५ जानेवारीला मालाड (Malad) पूर्वेकडील गणेश मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी परिसरात अनेक फलक लावण्यात आले होते. त्यावर छोटा राजनचा ‘आधारस्तंभ’ असा उल्लेख करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मालाडमध्ये हे फलक लागताच कुरार पोलिसांनी (Police) तात्काळ करावी करत ते फलक हटवले. तसेच, पोलिसांनी याप्रकरणातील काही जणांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 2015 मध्ये बाली, इंडोनेशिया येथून अटक केल्यानंतर भारतात पाठवण्यात आणण्यात आले. तेव्हापासून तो दिल्लीच्या (Delhi) तिहार तुरुंगात बंद आहे. 2011 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

चेंबूरमध्ये केक कापून वाढदिवस साजरा

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सध्या जेलमध्ये असला, तरी आजही त्याचे शिष्य त्याच्या जन्मदिवशी केक कापताना दिसतात. छोटा राजनच्या साथीदारांनी चेंबूरमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करत केक कापला. केकवर बिग बॉस असं लिहिलं होत. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईतील चेंबूरमध्ये ज्या व्यक्तीने छोटा राजनचा वाढदिवस साजरा केला, तो उद्धव ठाकरे गटातील एक पदाधिकारी आहे.

वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीला उद्धव ठाकरे गटाकडून नवी मुंबईतील संपर्क प्रमुख बनवण्यात आलं आहे. छोटा राजनच्या या शिष्याचं नाव निलेश पराडकर असून तो छोटा राजनसह अनेक प्रकरणात आरोपी देखील होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canara Bank Robbery : कॅनरा बँक दरोडा प्रकरणात हादरणारा ट्विस्ट, आरोपीचं नाव ऐकून बँक हादरली

Kids Health: मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय? सावधान! होऊ शकतो मायोपियाचा धोका, तज्ज्ञांनी दिली गंभीर इशारा

Genral Knowledge: पुरूषांना दाढी- मिशी येते मग महिलांना का नाही? कारण वाचून डोळे चक्रावतील

Maharashtra Live News Update: 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Bihar Government Formation: नितीश कुमार मुख्यमंत्री, भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'ही' २ नावं निश्चित

SCROLL FOR NEXT