Pune : 'त्या' खून प्रकरणाचा लागला छडा; हत्या करून बावधनच्या नाल्यात फेकले होते प्रेत! SaamTVNews
मुंबई/पुणे

Pune : 'त्या' खून प्रकरणाचा लागला छडा; हत्या करून बावधनच्या नाल्यात फेकले होते प्रेत!

बावधन येथील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सिमेंटच्या पोत्यात भरून हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील बावधन (Bavdhan) येथील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सिमेंटच्या पोत्यात भरून हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे या अज्ञात मृतदेहाची (Deadbody) ओळख पटवण्याचे आणि मारेकऱ्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान हिंजवडी (Hinjewadi) पोलिसांसमोर होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने एक दुचाकीच्या हालचालीवरून हिंजवडी पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीच्या मारेकऱ्यांना शोधून काढले आहे. (Deadbody Found In Bavdhan Canal)

हे देखील पहा :

राजू दिनानाथ महातो असे नाल्यात मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू महातो खून प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी सुनील मुन्ना चव्हाण, मुन्ना फुनी चव्हाण, योगेंद्र श्री गुलले राम आणि बरिंदर श्री गुलले राम या चार आरोपींना अटक केली आहे. यातील मयत आणि आरोपी हे घर पेंटिंग काम करणारे असून त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून त्यांनी राजू महातोचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT