Mumbai Latest news Saam tv
मुंबई/पुणे

Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेका; गृह विभागाकडे कुणी केली मागणी?

Mumbai Political News : औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेकण्याची मागणी केली आहे. हिंदू सेनेने गृह विभागाला पत्र लिहून औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर भाष्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. औरंगजेबाचा मुद्द्यावरून हिंदू सेना देखील आक्रमक झाली आहे. हिंदू सेनेने गृह विभागाला पत्र लिहून औरंगजेबाला क्रूर घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेकण्याचीही मागणी केली आहे. हिंदू सेनेच्या विष्णू गुप्ता यांनी गृह विभागाला पत्र लिहून तीन मागण्या केल्या आहेत.

'औरंगजेबाची कबर समुद्रात फेका'

विष्णू गुप्ता यांनी पत्रात औरंगजेबाच्या इतिहासाचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्रालयाला मुघल शासक औरंगजेब क्रूर असल्याची घोषणा करण्याची मागणी केली आहे. या व्यतिरिक्त देशभरात औरंगजेबाच्या नावाशी संबंधित रस्ते आणि ठिकाणांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. तिसऱ्या मागणीत म्हटलं की, 'महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेकण्याचीही मागणी केली आहे.

विष्णू गुप्ता यांनी पुढे म्हटलं की, 'औरंगजेबाच्या कबरीवर गरीबांसाठी रुग्णालय बांधण्यात यावे. औरंगजेबाने हिंदूंच्या अनेक मंदिर आणि मठांची तोडफोड केली. त्याने क्रूरपणे गुरु तेग बहादूर सिंह, गोकुला जाट आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आहे'. विष्णू गुप्ता यांच्या पत्रानंतर केंद्रीय गृहविभागाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय, हे पाहावे लागेल.

अबू आझमी काय म्हणाले होते?

सपा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर भाष्य केलं होतं. छावा सिनेमात औरंगजेबाचं पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा अबू आझमींनी केला होता. मुंबईच्या मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आझमी यांनी दावा केला की, औरंगजेबाने अनेक मंदिर बांधले आहेत. त्याच्या शासनाच्या काळात भारताला 'सोन्याचा पक्षी' म्हटलं जायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : झुकेगा नहीं साला! दुसऱ्या आठवड्यातही 'राजा शिवाजी'चा दबदबा; रितेश भाऊ मालामाल, कमावले तब्बल 'इतके' कोटी

Maharashtra News Live Update: बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला बांगलादेश सीमेवर सोलापूर पोलिसांनी पकडलं

Shrivardhan Tourism: कोकणातील श्रीवर्धनमध्ये घ्या कांदळवन सफरीचा आनंद; स्वच्छ बीच आणि सीफूडची खास मेजवानी

Sambhajinagar Accident : हळदीला जाताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा मृत्यू

TVK चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; थलापती विजय होणार तामिळनाडूचे मुख्यमंत्री, सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी

SCROLL FOR NEXT