Chandrakant Patil On Sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पवार म्हणतात म्हणजे परमेश्वर..., हिंदी भाषा सक्तीवरून चंद्रकांत पाटील यांची टीका

Chandrakant Patil On Sharad Pawar: हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर आज शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या प्रतिक्रियेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 'पवार म्हणतात म्हणजे परमेश्वर म्हणतात असं नाही ना, अशी टीका त्यांनी केली.

Priya More

हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी भाषा सक्तीला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला. राज ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांनी या भाषेला विरोध करत प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी आज या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया देत फडणवील सरकारवर तोफ डागली. शरद पवार यांना भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'पवार म्हणतात म्हणजे परमेश्वर म्हणतात असं नाही ना.', अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

हिंदी भाषेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, 'प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. समाजकारण शोधा.राज्यात हिंदी सक्ती झालेली नाही. इंग्लिश कशी काय जगाची भाषा आहे? जगात जायचं तर इंग्लिश पाहिजे असं का? तिसरी भाषा म्हणून हिंदीचा आग्रह नाही. तुम्ही इंग्लिशविरोधात आंदोलन करत नाहीत. १५० वर्षे ज्यांनी राज्य केलं त्यांची भाषा चालते आणि हिंदीला विरोध करताय. असं असेल तर इंग्लिशला विरोध करा.'

तसंच, 'इथे लोकशाही आहे ठोकशाही नाही. ज्याला शिकायचं आहे त्याला शिकू द्या ना. शिकवू देणार नाही पाट्या फोडू हे काय योग्य नाही. पवार म्हणतात म्हणजे परमेश्वर म्हणतात असं नाही ना. ही इस नॉट गॉड, ही इस गुड मॅन, ही इस एक्सपीरियन्स मॅन.', असं इंग्रजीमध्ये म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला. 'उद्यापासून पवार सांगतील पांढरा शर्ट घाला असं होणार नाही.', असा देखील टोला त्यांनी लगावला.

शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना हिंदी भाषा सक्तीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून थेट फडणवीस सरकारवर तोफ डागली. त्यांनी सांगितले की, 'हिंदीची सक्ती असू नये. जे हवं आहे ते करावं पण सक्ती नको. पालकांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे निर्णय घ्यावा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT