एमएमपी शाह कॉलेज Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घातलेल्यांना प्रवेश बंदी?

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावरून सर्वत्र चर्चा असतानाच मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठ संचालित एमएमपी शाह कॉलेज चर्चेत आलं आहे.

सुमीत सावंत

मुंबईतील माटुंग्यात एसएनडीटी विद्यापीठ संचालित एमएमपी शाह महाविद्यालय आहे. आणि हे महाविद्यालय सध्या चर्चेत आलंय ते इथल्या नियमांमुळे. कारण या महाविद्यालयात हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घातलेल्यांना प्रवेश बंदी आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरणा नंतर हे महाविद्यालय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलयं.

कर्नाटकमध्य (Karnatak Hijab Controversy) सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावरून सर्वत्र चर्चा असतानाच मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठ संचालित एमएमपी शाह कॉलेज चर्चेत आलं आहे. या महाविद्यालयाने हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घातलेल्यांना कॉलेजमध्ये प्रवेश बंदी केलीय. महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत हे नियम आहेत. या नियमांमध्ये दुपट्टा, घुंगट आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे आता या महाविद्याल्यावर टीका केली जातेय.

मुलींच्या सुरक्षेसाठी नियम

महाविद्यालयावर झालेल्या टिके नंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना राजे यांनी प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले आहेत. तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये असे नियम लिहिलेल आहेत. कारण पूर्वी मुले अशा प्रकारचे कपडे घालून मुलींना त्रास देत होती. ते लक्षात आल्यानंतर आम्ही हा नियम लागू केला असून या आधी नियमानुसार आम्ही मुलींना वर्गामध्ये बुरखा किंवा घुंगट काढून ठेवण्यास सांगतो. तसेच आमच्याकडे मुलींना प्रवेश देताना कोणत्याही धर्म किंवा जातीचा विचार केला जात नाही. सर्व मुलींनी एकसारखे राहून शिक्षण घ्यावे म्हणून बुरखा काढून टाकण्यास सांगितले जातं ”असं म्हणाल्या आहेत.

राज्यातील शिक्षण संस्थांना सूचना द्या

सपाचे भिवंडीतील आमदार आणि मुंबई महापालिकेतील सपाचे गटनेता रईस शेख यांनी याविषयी थेट गृहमंत्र्यांना ननिवेदन दिलंय. या निवेदना मध्ये "कर्नाटक राज्यामध्ये सरकारने शिक्षण संस्थामध्ये समान वेश परिधान करण्याच्या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईतील श्रीमंती.मनिबेन एम.पी.शहा.महिला महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. याचे पडसाद उमटू नयेत म्हणुन राज्यातील शिक्षण संस्थांना विषेश सूचना देण्यात यावेत" अशी निवेदनतून मागणी केलीय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

SCROLL FOR NEXT