Banking Service: KYC ची ही नवीन पद्धत आणेल गोत्यात

सर्व बँका आपल्या ग्राहकांना याबाबत सावध करत आहेत आणि फोनवर माहिती देऊ नका असे आवाहन करत आहेत.
Banking Service Froud
Banking Service FroudSaam TV

आजकाल ई-केवायसीच्या नावावर सर्वाधिक फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे तुम्हाला सेवा प्रदाता म्हणून फोन करु शकतात. फोनवर ते सांगू शकतात की तुमच्या बँक खात्याचा केवायसी नाही आणि ते लवकरच बंद होईल. फसवणूक (KYC Froud) करणारे असेही म्हणू शकतात की तुमचे बँक खाते लवकरच बंद होणार आहे. तुम्हाला ते पुन्हा सुरु करायचे असल्यास, लगेच आधार तपशील आणि बँक खात्याचा तपशील द्या. हे उघड आहे की खाते बंद होण्याच्या भीतीने तुम्ही केवायसी तपशील देताल. (eKYC Froud)

सर्व बँका आपल्या ग्राहकांना याबाबत सावध करत आहेत आणि फोनवर माहिती देऊ नका असे आवाहन करत आहेत. मात्र ग्राहक पूर्वीपेक्षा अधिक फसवणुकीला बळी पडत आहेत. याचे कारण फसवणूक करणारे दररोज फसवणुकीचे मार्ग बदलून लोकांना आपल्या जाळ्यात घेत ओढत आहेत. तुम्हाला या फसवणुकीच्या बदलाची माहिती असली पाहिजे नाहीतर तुम्ही त्या फसवणुकीला बळी पडाल.

Banking Service Froud
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण! 'माणसं नाही तर हैवान, फासावरचं लटकवायला हवंय'

अलीकडे फसवणुकीची एक नवीन पद्धत समोर आली आहे. व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे ही फसवणूक केली जात आहे. फसवणूक करणारे ग्राहकांना मेसेज पाठवतात, ज्यामध्ये अशा नंबरवर eKYC अपलोड करा असे लिहिलेले असते. eKYC न केल्यास तुमचा मोबाईल नंबर बंद होईल. यामुळे त्रस्त होऊन एक मोबाईल यूजर मेसेज असलेल्या नंबरवर कॉल करतो. कॉल केल्यावर, फसवणूक करणारा वापरकरकर्त्याच्या मोबाइलवर TeamViewer अॅप डाउनलोड करण्यास सांगतो. एकदा तुम्ही TeamViewer डाउनलोड केल्यानंतर, तुमच्या मोबाईल संपूर्ण फसवणुक करणाऱ्याच्या नियंत्रणाखाली जातो.

RBI काय म्हणते?

आरबीआयच्या मते, या प्रकारच्या फसवणुकीला विशिंग म्हणतात, ज्यामध्ये फसवणूक करणारा कंपनी किंवा बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून तुमच्याकडून माहिती गोळा करतो. फसवणूक करणारे स्वत:ला नॉन-बँक ई-वॉलेट प्रदाता किंवा दूरसंचार सेवा प्रदाता म्हणूनही कॉल करू शकतात. खाते बंद करणे, सिम कार्ड ब्लॉक किंवा डेबिट-क्रेडिट कार्ड ब्लॉक होण्याची धमकी देवून ग्राहकांना केवायसी माहिती विचारली जाते. त्यानंतर बँक खात्यातून फसवणूक करून पैसे काढले जातात. दुसरीकडे, फिशिंग झाल्यास ग्राहकाला मेल किंवा एसएमएस पाठवला जातो आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करून बँकिंग माहिती चोरली जाते. तुमच्यासोबत अशी कोणतीही घटना घडल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी.

तक्रार कशी दाखल करावी

* फोन आला असेल तर रेकॉर्ड करा, मेल किंवा मेसेज आला असेल तर सेव्ह करा.

* अशा मेसेजचा किंवा मेलचा स्क्रीनशॉट घ्या. ज्या नंबरवरून कॉल आला त्याचा उल्लेख करा.

* हा स्क्रीनशॉट आणि बँक व्यवहाराचे विवरण गोळा करा आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.

* या सर्व कागदपत्रांच्या आणि फॉर्मच्या फिजिकल कॉपीसह एक सॉफ्ट कॉपी बनवा आणि ती सीडी-आर मध्ये संग्रहित करा.

काय काळजी घ्यावी

1. कोणत्याही चुकीच्या फोन कॉल्स, ईमेल आणि एसएमएस संदेशांपासून सावध रहा.

2. तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती फोनवर किंवा अशा कोणत्याही व्यक्तीला देऊ नका.

3. कोणत्याही इंटरनेट फॉर्मवर क्रेडिट कार्ड तपशील भरू नका. तुमची माहिती चोरीला जाऊ शकते.

4. संगणक किंवा मोबाईल फोनवर रिमोट ऍक्सेस अॅप ठेवू नका. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना तुमची बँकिंग माहिती चोरता येते.

5. संशयास्पद ईमेल किंवा संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नका.

6. कोणताही विचार न करता कोणताही QR कोड स्कॅन करू नका, यामुळे तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जाऊ शकतात.

7. कोणताही व्यवहार फक्त पासवर्ड आणि ओटीपीच्या आधारे करा.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com