Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पुण्यात (Pune) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना मराठा समाजाविषयी सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून पुण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे देखील पाहा-

शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हिंसक आंदोलन प्रकरणी सदावर्तेंना जामीन मिळून देखील ते अद्याप जेलमध्ये (prison) आहेत. कारण अद्याप त्यांनी जामीनाच्या अटीशर्तींची पूर्ताता केली नाही. मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य सदावर्तेंनीच केले होते हे तपासण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारची (State Government) उच्च न्यायालयाला सांगितले होते. मात्र, सातारा पोलिसांनी यासंदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतल्याने परत त्याची गरज काय? असा सवाल कोर्टाने केला आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूर कोर्टात दाखल झाले होते. २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला आहे. मात्र, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT