Mumbai High Court Google
मुंबई/पुणे

Government Advertisements : सरकारी जाहिरातींवरून न्यायालयाचे ताशेरे; जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीची उधळपट्टी रोखण्यासाठी समितीची स्थापन करण्याचे आदेश

Mumbai High Court News : सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा दावा करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारला समितीची स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा वापर होऊ नये यासाठी समितीची स्थापना करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा दावा करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारला हे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत जनहित याचिका करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक मीडिया अथवा वृत्तपत्रातील सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जनहित याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला असे निर्देश दिले आहेत. तसेच तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश देखील राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून समितीची पुनर्रचना करून ती पुन्हा सक्रिय करण्याचेही आदेश न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. २०१५ मध्ये देखील अशा प्रकरणांना चाप बसवण्यासाठी त्रिसदस्यीय समितीच्या स्थापनेचे आदेश देण्यात आले होते. तसेच एप्रिल २०१६ मध्येही पुनरुच्चार करण्यात आला होता. त्यामुळे, राज्य सरकारने लवकरात लवकर या त्रिसदस्यीय समितीची स्थापना करावी असे आदेश खंडपीठाने दिलेत.

जनसंपर्क महासंचालनालयाची चौकशी होणार?

एडिटर्स फोरमने दाखल केलेल्या जनहित याचिकेत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) तसेच सरकारी संस्थांमार्फत होणाऱ्या कामांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करावे अशीही मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीवेळी न्यायालयाकडून असे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT