Ganesh Bidkar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: भाजपला मोठा धक्का! गणेश बिडकर यांचे सभागृह नेते पद रद्द

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे - पुण्यात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे कारण नगरसेवक गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद उच्च न्यायालयाने (High Court) रद्द केले आहे. त्यामुळे महापालिकेची मुदत अवघ्या 2 आठवड्यात संपणार असताना हा भाजपला धक्का बसला आहे. दरम्यान, न्यायालयाचा लेखी आदेश आल्यानंतर याबाबत भाष्य केले जाईल असे गणेश बीडकर यांनी सांगितले केले आहे.

हे देखील पहा -

काँग्रेसचे पुरस्कृत अक्षप नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी मार्च २०२१ मध्ये उच्च न्यायालयात बिडकर यांची महापालिकेच्या सभागृहनेते पदी निवड झाल्याने याविरोधात याचिका दाखल केली होती. या न्यायमूर्ती ए.ए. सय्यद आणि एस. जी. दिघे यांच्या खंडपिठाने सप्टेंबर महिन्यात या याचिकवेर सुनावणी घेतली. तेव्हापासून याचा निर्णय प्रलंबित होता. त्यानंतर काल (२८ फेब्रुवारी) यावर सुनावणी झाली, अशी माहिती धंगेकर यांचे वकील कपील राठोड यांनी दिली.

स्विकृत नगरसेवकास सभागृहनेतेपद देता येत नाही, त्यामुळे गणेश बिडकर यांचे पद रद्द करावे आणि त्यांच्या काळात झालेली सर्व निर्णय देखील रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. काल यावर सुनावणी झाली त्यानंतर गणेश बिडकर यांचे पद रद्द केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचा आॅर्डर दोन दिवसानंतर निघणार असून त्यानंतर बीडकर यांना यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात येणार असल्याचे देखील राठोड यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: एक-दोन नाही तर २०२४ मध्ये इतक्या वेळा शून्यावर बाद झालाय विराट!

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT