High Alert in Mumbai Saam
मुंबई/पुणे

मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?

High Alert in Mumbai: मुंबईच्या कोलाबा परिसरात नेव्ही अग्निवीराची रायफल चोरी. नेव्ही गणवेश घालून आलेल्या घुसखोराने फसवणूक करून रायफल पळवली. नौदल, एटीएस आणि मुंबई पोलिस तपासात गुंतले.

Bhagyashree Kamble

  • मुंबईच्या कोलाबा परिसरात नेव्ही अग्निवीराची रायफल चोरी.

  • नेव्ही गणवेश घालून आलेल्या घुसखोराने फसवणूक करून रायफल पळवली.

  • नौदल, एटीएस आणि मुंबई पोलिस तपासात गुंतले.

  • शहरात हाय अलर्ट जाहीर, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.

मुंबईत ६ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारानं खळबळ उडाली आहे. कुलाबा परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं नौदलाच्या अग्निवीराला फसवून त्याची रायफल आणि काडतूसे पळवली. अज्ञात व्यक्तीनं भारतीय नौदलाचा गणवेश घातला. नंतर चक्क रायफल आणि काडतुसे पळवली. या घटनेनंतर मुंबईत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्या एटीएस, नौदल आणि मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेव्हीचा गणवेश घालून आलेल्या अग्नीवीराला 'तुझी ड्युटी संपली', असं सांगून त्याच्या हातातील रायफल घेतली. अधिकाऱ्यांच्या गणवेशात असल्याकारणाने त्याला संशय आला नाही. मात्र, काही वेळातच तो रायफल घेऊन पसार झाला.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर तातडीने नौदल, एटीएस आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाल्य़ा. कफ परेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या ठिकाणी शोधमोहिम राबवण्यात आली आहे. परंतु, घुसखोराबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे तपास सुरू आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नौदलाने स्वतंत्र समिती नेमली असून, घुसखोराकडे नौदलाचा गणवेश आलाच कसा? तो अज्ञात व्यक्ती अग्निवीरपर्यंत पोहोचला कसा? याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP And Panchayat Samiti Election: दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला, दोन दिवसात घोषणा होणार?

Badlapur News : बदलापुरात भाजपला मोठा धक्का; अर्ज भरण्याच्या अर्धा तासाआधी बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची चाचणी लवकरच, सूरत स्टेशनचा लूक पाहून व्हाल चकीत; पाहा VIDEO

Traffic Signal Light: ट्रॅफिक लाईट म्हणजे काय? लाल, हिरवा आणि पिवळा रंगाचा अर्थ काय?

Maharashtra Live News Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्मिताताई वाघमारे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT