Helmet compulsory in Pune
Helmet compulsory in Pune Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: पुण्यात आता हेल्मेट सक्ती (Helmet compulsory in Pune) करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. उद्यापासून हे नियम लागू होणार होणार आहेत. जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच सह प्रवाशाच्या सुरक्षिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणारं आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अपघातात सर्वात जास्त अपघात दुचीकी चालवणाऱ्या यांचे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोठेही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणा-या तसेच पाठीमागे बसणा-राया व्यक्तीला हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. दरम्यान या अगोदरही पुण्यात अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. परंतु पुणेकरांनी हे सर्व नियम धुडकावून लावले आहेत. पुणे शहरातील लोकांचा कायमचं हेल्मेट सक्तीला विरोध राहिला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश पुणेकर पाळतात की यालाही केराची टोपली दाखवतात हे उद्यापासून समजेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT