heavy vehicles banned at pune ahmednagar highway  saam tv
मुंबई/पुणे

Ban On Heavy vehicles : पुणेकरांनाे! 'या' रस्त्यांवर अवजड वाहनांसह पार्किंगला बंदी, पाच मार्चपर्यंत नाेंदवा हरकती (पाहा व्हिडिओ)

अवजड वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना धोका निर्माण होवून गैरसोय होते.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News :

पुणे - नगर महामार्गासह (pune nagar highway) इतर रस्त्यावर जड वाहतुकीस आणि पार्किंग करण्यास वाहतुक शाखेने बंदी घालण्यात आली आहे. सकाळी सात ते दहा व सायंकाळी पाच ते नऊ यावेळेत ही बंदी असेल. यावर पाच मार्चपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

वाहतूक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगीक तत्वावर हा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशात पुणे - नगर महामार्गासह इतर रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास बंदी केल्याचे म्हटले आहे.

अवजड वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना धोका निर्माण होवून गैरसोय होते. हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर येत्या पाच मार्चपर्यंत नागरिकांना हरकती नाेंदविता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या रस्त्यावर असणार बंदी

पुणे - नगर महामार्ग

वाघोली वाघेश्वर चौक ते खराडी बायपास

वाघोली ते शिवाजी चौक केसनंद गांव

लोहगांव वाघोली रोड

वाघोली लोहगांव चौक ते लोहगांव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाघेश्वर चौक

वाघोली ते लोणीकंद

लोहगाव ते पेट्रोलसाठा चौक ते विश्रांतवाडी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Beauty Tips : ग्लोइंग त्वचा आणि लांब सडक केस पाहिजेत? मग काय खावं समजून घ्या

Maharashtra Live News Update: - कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव नतंर अमरावतीत सुद्धा 15 ऑगस्टला मटन चिकनची विक्री बंद

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT