Heavy rains start in Mumbai local train services delayed 15 to 20 minutes traffic updates Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुसळधार पावसाने मुंबईकरांची कोंडी; लोकल ट्रेन धीम्या गतीने, रस्ते वाहतूकही मंदावली

Mumbai Rain Local Train News: मुसळधार पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही बसला आहे. पावसामुळे लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Rain Local Train News: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत गुरूवारपासून पावसाची संततधार सुरू होती. शुक्रवारी सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आणखीच वाढला. मुसळधार पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही बसला आहे. पावसामुळे लोकल ट्रेन (Mumbai Local Train) १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहे.

लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेच्या (Harbar Line) काही ट्रेन १०-१५ मिनिटं उशीराने धावत आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० मिनिट उशिराने सुरू आहे.

रस्ते वाहतूकही मंदावली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

दुसरीकडे ठाणे ते मुंबईच्या (Mumbai News) दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. मुलुंड टोल नाक्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. या भागात रस्त्यांची कामे झाली असली, तरी वाहने धीम्या गतीने जात आहे. त्यामुळे पावसात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे

अंधेरी सबवेमध्ये साचलं पावसाचं पाणी

अंधेरीत देखील जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेमध्ये देखील पाणी साचले आहे. सबवेमध्ये चार फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वेमधून वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढणार

येत्या तीन ते चार तासांत मुंबईसह (Mumbai Rain Alert) राज्यात पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामाना खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार, रायगड, पालघर आणि पुणे येथे ३० जून रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT