Mumbai Rain update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain : मुंबई,ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Mumbai Rain update : मुंबई,ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरुये. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Vishal Gangurde

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्याने नागरिकांची तारांबळ

दिवाळीपूर्वी बाजारपेठांमध्ये पाऊस झाल्यामुळे खरेदीला मोठा फटका

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विजेचे खांब कोसळले

मुंबई आणि नजीकच्या परिसरात पावसात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीसाठी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे ​वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला आहे.

मुंबईच्या विक्रोळीत ढगांच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईसह नवी मुंबईतील काही भागात ढगांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोसळधार

कल्याण आणि डोंबिवली परिसरात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. ​उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे. पण अचानक झालेल्या पावसामुळे ​दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची आणि विक्रत्यांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे काही भागांमध्ये बत्तीगुल झाली आहे.

पावसामुळे बदलापूरकरांची तारांबळ

बदलापूर शहरात आज संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे अनेकांनी बाजारपेठेत तसेच मुख्य रस्त्यांलगत फटाक्यांची आणि दिवाळी साहित्याची दुकानं थाटली आहेत. अचानक आलेल्या पावसाचा मोठा फटका या व्यापाऱ्यांना सहन करावा लागला. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे सर्वच व्यापारी वर्गाची चिंता वाढलीय.

ठाण्यात परतीच्या पावसाची दमदार हजेरी

ठाण्यात मागील अनेक दिवसांपासून गायब झालेल्या अवकाळी पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना याचा फटका बसला आहे

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात परतीच्या पावसाने काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याची घटना घडली आहे. तर शेतामध्ये कापून ठेवलेल्या भात भिजले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT