Heavy Rain In Pune Car washed away in flood water in Wanwadi Saam TV
मुंबई/पुणे

Heavy Rain In Pune : पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप; वानवडीत कार गेली वाहून; पाहा VIDEO

पुण्यात पावसाचा जोर इतका भयंकर होता, की सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली.

Satish Daud

Heavy Rain In Pune : पुणे शहरात सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास धुव्वाधार पाऊस (Pune Rain) झाला. या पावसाने कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागातील नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. पावसाचा (Rain) जोर इतका भयंकर होता, की सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. वानेवाडी भागात आलेल्या पुरामुळे रस्त्यावर उभी असलेली कार वाहून नागरिकांच्या डोळ्यादेखत वाहून गेली. (Pune Rain News)

सोमवारी रात्री साडेनऊ ते साडेदहा या २ तासांमध्ये पुण्यातील शिवाजीनगर परिसरात तब्बल ८१ मिलिमीटर पाऊस झाला. धुव्वाधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. अनेक घरांमध्येही पाणी शिरलं. या भागातून रात्री १२ वाजेपर्यंत २५ हून अधिक कुटुंबीयांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून मदतीची याचना केली. (Breaking Marathi News)

दरम्यान, वानेवाडी भागातील होले मळा येथे रस्त्याच्या कडेला लावलेली कार नागरिकांच्या डोळ्यादेखत वाहून गेली. या सर्व घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काळ्या कलरची एक कार रस्त्याच्या कडेला उभी आहे. अचानक पुराचा लोंढा येतो आणि रस्त्याच्या कडेला लावलेली ही कार पाण्यात वाहून जाते. (Car Washed Away In Flood Water In Wanwadi)

दगडुशेठ गणपती मंदिरात शिरलं पाणी

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील प्रसिद्ध दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरालाही बसला आहे. पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडुशेठ गणपती मंदिरातही पावसाचं पाणी शिरलं. गणपती मंडळाच्या वतीने रात्री उशीरापर्यंत मंदिरात शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू होतं.याव्यतिरिक्त श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयात देखील पाणी लागलं आहे.

रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचा तोल जात होता. या वेगामुळे रस्त्याच्या कडेला लावलेल्या अनेक दुचाकीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या माणिक नाला, नागझरी, आंबिल ओढा, दुथडी भरून वाहत होते. या नाल्याच्या कडेने राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पुण्यात पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT