Maval Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Bhaubeej Special : प्रेम आणि नात्यांचा अनोखा उत्सव, वीटभट्टीवर कष्टकरी मजुरांनी साधेपणात साजरी केली भाऊबीज

Maval Pune News : मावळच्या टाकवे बुद्रुक गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कष्टकरी मजुरांनी साधेपणात पण प्रेमानं भाऊबीज साजरी केली. भेटवस्तू नसल्या तरी नात्यांचं सोनं उजळलं आणि उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं.

Alisha Khedekar

मावळच्या वीटभट्टीवर कष्टकरी मजुरांनी साधेपणात भाऊबीज साजरी केली

भेटवस्तू नव्हत्या, पण प्रेम आणि आपुलकीची ओवाळणी झाली

उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा साधा पण भावनिक सोहळा

माती, संस्कार आणि प्रेम यांचा संगम असलेली “खरी भाऊबीज” मावळात उजळली

दिलीप कांबळे, मावळ

देशभरात भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा होत असतानाच, मावळच्या टाकवे बुद्रुक गावातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या संसारातही आज आनंदाचा दिवा पेटला. बीड जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधात आलेले हे कष्टकरी कामगार, आपल्या घरापासून दूर असले तरी संस्कार मात्र पिढ्यानपिढ्या हृदयात घट्ट रुजलेले.

मावळच्या टाकळी बुद्रुक येथील वीटभट्टीच्या ओसाड माळावर, लाल मातीच्या पार्श्वभूमीवर, छोट्या मुलींनी थरथरत्या हातांनी आपल्या भावांना ओवाळलं. काहींकडे ओवाळणीचे पैसे नव्हते, भेटवस्तू नव्हत्या, पण प्रेम आणि ममतेचा तो सोहळा मात्र सोन्याहून पिवळा ठरला. पैसे नव्हत तरी भावबंध दृढ होता; भेटवस्तू नव्हत्या, तरी आपुलकी ओसंडून वाहत होती.

या साध्या पण हृदयस्पर्शी दृश्याने उपस्थितांच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. शहरात झगमगाटात हरवलेली नाती, इथे मातीत आणि घामात फुलताना दिसली. मावळच्या मातीतल्या या वीटभट्टीवर आज खरी “भाऊबीज” साजरी झाली. सोन्या-चांदीत नाही, तर प्रेमाच्या निखळ बंधनात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

Instant Noodles: आठवड्यातून दोन वेळा नूडल्स खाताय? आताच व्हा सावध , अन्यथा 'या' गंभीर आजाराचा वाढेल धोका

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तुडूंब पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली; २ मुली बुडाल्या

SCROLL FOR NEXT