बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही! SaamTVnews
मुंबई/पुणे

बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही!

डोंबिवलीत गाडी चोरीचा एक अजब प्रकार पुढे आला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत गाडी चोरीचा एक अजब प्रकार पुढे आला आहे. बायकोला आणण्यासाठी चालक मालकाची गाडी न सांगताच गावाला घेऊन गेला आणि चालक परत आलाच नाही. अखेर ४ महिन्यानंतर चालकाला विष्णूनगर पोलीसांनी केली अटक आहे. रतन उर्फ जितू मासरे (वय ४३) असे आरोपी चालकाचे नाव आहे.

हे देखील पाहा :

डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर मोठागाव येथून मालकाची गाडी घेऊन चालक पसार झाला होता. याबाबत जानेवारी महिन्यात डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस स्थानकात चालकाच्या सांगण्यावरून तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी गाडी चालकाचा शोध सुरू केला. सदर गुन्ह्यातील महिंद्रा बुलेरो गाडी जळगाव मधील चाळीसगाव येथे बेवारस स्थितीत आढळून आली होती.

विष्णुनगर पोलिस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि अंमलदार यांनी डम डाटाचा वापर करून आणि तांत्रिक पध्दतीने चालक आरोपी जितू मासरे याला चाळीसगाव येथून अटक केली. सदर आरोपी आपल्या बायकोला आणण्यासाठी मालकाला न सांगत गाडी चोरून घेऊन गेला. मात्र, बायको येत नसल्याने आणि मालकाची गाडी न सांगता घेऊन गेल्याने आरोपी चार महिने जळगाव, चाळीसगाव आणि नाशिक परिसरात राहत होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

Amravati Tourism: अमरावतीमधील हा किल्ला देतो इतिहासाची साक्ष; एका सुट्टी नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT