Gunratna Sadavarte Saam Tv
मुंबई/पुणे

गुणरत्न सदावर्ते यांना ' या ' दोन प्रकरणांत अटकपूर्व जामीन

जातीय द्वेष पसरवल्याचा आरोपाखाली गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सिल्व्हर ओक हिंसक आंदोलन प्रकरणी अडचणी सापडलेले आरोपी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना सोलापुरात दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे, तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निकालाबाबत टीका करुन बदनामी आणि जातीय द्वेष पसरवल्याचा आरोपाखाली सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल (Police fir) करण्यात आला होता. मात्र, दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीनावर (Pre arrest bail) मुक्तता करण्याचा आदेश सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे वकील संतोष न्हावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये सदावर्ते यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. छावाचे अध्यक्ष योगेश पवार आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

दोन समाजात तेढ निर्माण करणे तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निकालाबाबत टीका करुन बदनामी आणि जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला होता. परंतु, आता दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिल्याने सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली गोरख धंदा, पोलिसांनी छापा टाकताच सर्व सैरभैर; पुण्यात खळबळ

MNS : मनसेची पुन्हा टोलधाड! अख्खा टोलनाका फोडला | VIDEO

No Overtime : ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टिम

दापोडी ST कार्यशाळेतील भांडार खरेदी घोटाळा; दोषींवर कारवाई होणार; मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १५ दिवस प्रतिबंधात्मक आदेश; ५ पेक्षा जास्त लोकही जमू शकत नाहीत! नेमकी कशावर घातलीय बंदी?

SCROLL FOR NEXT