Gunaratna Sadavarte Manoj Jarange x
मुंबई/पुणे

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Gunaratna Sadavarte On Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून सरकारने जीआर काढला.

  • आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावर गुणरत्न सदावर्ते आक्षेप.

  • पोलिसांवर झालेल्या मारहाणीचे गुन्हे मागे घेणे शक्य नसल्याचे त्यांचे मत.

  • सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची सदावर्ते यांची घोषणा.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे ५ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने आज त्यांच्या मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला. सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच मनोज जरांगेंना लॉलिपॉप मिळाला असल्याची टीका सदावर्ते यांनी केली.

मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे त्यांनी जरांगेंना सांगितले. यासंदर्भातला मसूदा देखील त्यांनी दिला. यामध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचेही सरकारने मान्य केल्याचे नमूद केले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

जर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले तर मी कोर्टात जाणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आंदोलनादरम्यान आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांना मारहाण झाली होती. मराठा आंदोलकांवर दाखल असलेले अशाप्रकारचे गुन्हे मागे घेतले तर मी कोर्टात जाणार. पोलिसाचा मुलगा म्हणून मी सांगतो की पोलिसांना मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीत. हे गुन्हे सरकार परत घेऊ शकत नाही. अशाप्रकारचे गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. जरांगे आणि मराठा लीडरशिपमुळे मारहाण केलेले गुन्हा मागे घेतले गेले तर मी कोर्टात जाणार. तसेच ज्यांच्या दबावामुळे हे गुन्हे मागे घेतले जातील त्या सगळ्यांना मी प्रतिवादी करून न्यायालयामध्ये उभे करणार.', असा इशारा सदावर्ते यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अवकाळीचा पुणे शहराला तडाखा, १४ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना

Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Weight Loss Recipe : चटपटीत 'इडली'ला बनवा हेल्दी, फक्त टाका 'हा' एक पदार्थ, झपाट्याने वजन होईल कमी

Explainer: लहान उद्योजकांसाठी खास टिप्स, हा नवा कसा गेम चेंजर ठरणार? वाचा सविस्तर

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT