Adv. Gunaratna Sadavarte Saam TV
मुंबई/पुणे

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात; सनद रद्द करण्याची मागणी

मुंबईच्या हिंदमातामधील ज्या टॉवरमध्ये सदावर्ते राहतात त्या इमारतीला अजूनही मुंबई महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाली नसल्याने त्यांचे ते घरही अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगेश कचरे

बारामती : राज्यातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ल्या करणाऱ्या एसटी कामगारांना भडकविल्याच्या प्रकरणात आरोपी असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सिल्वर ओक हल्ल्याचा कट तसंच प्रक्षोभक भाषणं करुन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या सदावर्ते यांची वकिली धोक्यात आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI) नितीन यादव यांनी सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी गोवा आणि महाराष्ट्र बार कौन्सिलकडे केली आहे.

मराठा आरक्षणाला विरोध केल्यापासून अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील चर्चेत आले होते. त्यातच त्यांनी जवळपास वर्षभर सुरु असणाऱ्या एसटी कामगारांच्या संपाचे नेतृत्व तसंच एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडल्यापासून ते चांगलेच चर्चेत होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ल्या झाल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून (Mumabi Police) अटक करण्यात आली होती.

शिवाय या हल्ल्याप्रकरणी त्यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली असतानाच यांच्या विरोधात सातारा, कोल्हापूरसह राज्यभरातील विविध भागात त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्यांचा ताबा मागितला आहे. त्यामुळे आधीच वादात सापडलेले सदावर्ते यांनी वकिली क्षेत्राचा गैरवापर करून विविध ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी नितीन यादव यांनी केल्याने सदावर्तेंची वकिली आता धोक्यात आली आहे.

सदावर्तेंच घरही अनधिकृत -

हे देखील पाहा -

तसंच आज सदावर्तेंबाबत आणखी खुलासे झाले आहेत. मुंबईच्या हिंदमातामधील क्रिस्टल टॉवर या 16 मजली इमारतीत सदावर्ते राहतात. मात्र या इमारतीला अजूनही मुंबई महापालिकेकडून (BMC) भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाली नसल्याची माहिती समोर आली असून हे घर अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेच्या घरातून पैसे मोजायचं मशीन, २ रजिस्टर ताब्यात घेतली असून त्यांच्या काही मालमत्ता आणि केरळमधून घेतलेल्या गाडीबाबत चौकशी करायची असल्याने त्यांची कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर पोलिसानाही त्याचा ताबा हवा आहे. त्यांना आता ताबा दिला जाईल अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT