Gunaratna Sadavarte/ Sharad Pawar
Gunaratna Sadavarte/ Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

शरद पवार, परबांमुळे ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कोर्ट म्हणाले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा - सदावर्ते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात एसटी आंदोलना संदर्भातील पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार असून या पार्श्वभूमीवर वकिल गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी आझाद मैदानील ST कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सरकारवर निशाना साधला. ते म्हणाले, न्यायालयात आज सरकारची पळपुटी झाली, न्यायालयाने सरकारला ५० लाख रूपयांची मदत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना करावी असं सांगितलं आहे. कर्मचारी डिप्रेशन मध्ये आहेत त्यामुळे ते कामावर येत नाही. कोणतीही कारवाई कर्मचाऱ्यांवर होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

एसटी कर्मचा-यांच्या (ST Employee) विलिनीकरणाकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करत, 5 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असल्यानं निर्णय घेण्यात उशिर झाल्याची राज्य सरकारने कबूली दिली आहे. अनिल परब (Anil Parab) आपली संपत्ती मोजत घरात बसेलेत त्यांनी कोकणात खाजगी गाड्या चालवुन पैसे लाटले तेच कष्टकरांनाचे हाल बघताय सरकार चे भान जागेवर नाही. सरकार ची सटकली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

सरकारने आज कोर्टाकडे आणखी 15 दिवसांचा वेळ हवा असं सांगितलं आहे. मी कोणावर टीका करत नाही. पण तुम्ही यातून बाहेर पडावं ही माझी भावना आहे. परंतु सरकारने सांगितलं कि आम्ही या लोकांच्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात विचार करत आहोत असं ते म्हणाले.

दरम्यान, सरकारने सांगितलं कि न्यायालयाने कामावर या असं सांगितले पण मी म्हणालो की, उच्च न्यायालयाने असं काही नाही सांगितलं. आणि मी सांगितलं कि शरद पवार आणि अनिल परब (Sharad Pawar and Anil Parab) यांच्या मुळे आत्महत्या झाल्या. यावर कोर्ट म्हणाले, 'ज्यांच्यामुळे या आत्महत्या झाल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करावा' याला म्हणतात संविधानाची शक्ती मग न्यायालयात समोर आलं कि गाड्या चालल्यात नाहीत तर सामान्यांचे काय होईल ? पण आज उच्च न्यायालयाने आज आदेश दिला कि ज्यांचे जीव गेले त्यांना 50 लाख भरपाई द्या असही सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : पाचव्या टप्प्यासाठी PM नरेंद्र मोदी सज्ज; मुंबईत रोड शो, कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा

Kolhapur News: दुर्दैवी घटना! पैशासाठी सावकाराचा तगादा, जीवे मारण्याची धमकी, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

Traffic On Mahabaleshwar Panchgani highway: महाबळेश्वर पाचगणी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा,पर्यटक हैराण

Alia Bhatt Interview : "अन्यथा भविष्यात तुला 'ती' चूक महागात पडेल...", आलिया भट्टला वडिलांनी लेकीसाठी दिला मोलाचा सल्ला

Assam Crime News: अरे बापरे! इंजिनियरच्या घरात सापडलं लाखोंचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारी बुचकळ्यात, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT