mumbai crime news Saam tv
मुंबई/पुणे

गुजरातमधील ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; तब्बल ७५ कोटींचा मुद्देमाल जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

mumbai crime : गुजरातमधील ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तब्बल ७५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल आहे.

Saam Tv

मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई

गुजराजमधील ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उघडकीस

पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराला अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने गुजरातमधील मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाकडून या प्रकरणात ॲप-आधारित कॅब (ओला-उबर) चालक असलेल्या 26 वर्षीय महिलेच्या अटकेनंतर तपासाची साखळी पुढे सरकत मुख्य सूत्रधार वझुल कमर अबुल वफा चौधरी उर्फ पप्पू (वय 54) याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी 21 मे रोजी साकीनाका परिसरातून संबंधित महिलेला 101 ग्रॅम मेफेड्रॉनसह ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने हा अमली पदार्थ चौधरी याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. तपासादरम्यान महिलेने ड्रग्स पुरवठा करण्यासाठी ॲपवर आधारित टॅक्सीचा वापर करत असल्याचे कबूल केले. शिवाय ड्रग्स पुरवठा करताना तिला 900 च्या बदली बाराशे रुपये मिळत असे. मागील तीन वर्षापासून महिला या व्यवसायात सक्रिय असल्याचे तिने कबूल केले.

तपासादरम्यान चौधरीने गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील वरखड गावात भाड्याने घेतलेल्या घरात मेफेड्रॉन तयार करण्याचा कारखाना सुरू केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार साकीनाका पोलिसांच्या पथकाने गुजरातमध्ये छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 20 किलो द्रवरूप मेफेड्रॉन, विविध रसायने, उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (FSL) अहवालात जप्त पदार्थ मेफेड्रॉन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस तपासात चौधरीने डोंगरीतील आणखी एका आरोपीकडून मेफेड्रॉन तयार करण्याचे तंत्र शिकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने स्वतःची उत्पादन आणि वितरण साखळी उभी करून मुंबईसह आसपासच्या भागात ड्रग्जचा पुरवठा सुरू केला होता. अटक करण्यात आलेली महिला ॲप-आधारित कॅब चालक असून ती साकीनाका आणि परिसरात मेफेड्रॉनच्या विक्रीत सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ती यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्य आरोपी चौधरी हा सराईत गुन्हेगार असून 2001 पासून अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. 2001 मध्ये मोठ्या प्रमाणात चरस प्रकरणात त्याला अटक झाली होती. पुढे 2001 ते 2011 या काळात तो तुरुंगात होता. त्यानंतर 2017 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) त्याला 238 किलो एमडी प्रकरणात अटक केली होती. 2017 ते 2023 या कालावधीत तो ठाणे कारागृहात होता. गेल्या सहा ते सात वर्षांपासून तो मेफेड्रॉनची निर्मिती आणि पुरवठा करत असल्याचा संशय आहे.

संपूर्ण कारवाईत मेफेड्रॉन, रसायने, उत्पादन साहित्य आणि इतर वस्तूंसह सुमारे 75 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या रॅकेटचे इतर दुवे, आर्थिक व्यवहार आणि वितरण नेटवर्कचा तपास साकीनाका पोलीस करत असून आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Sleeves Design: लग्नसराई किंवा पार्टीसाठी ट्राय करा ब्लाउजच्या हातांचे ७ लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

दाऊद इब्राहिमच्या राइट हँडवर ईडीचा मोठा शिकंजा, मुंबई-गुजरातसह 20 ठिकाणी एकाचवेळी छापे

CBSE अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ताची बदली; मोदी सरकारची मोठी कारवाई

रात्री ८ वाजताच दुकानांची शटर करा बंद! सरकारचा नागरिकांना आदेश, शेजारील देशात काय घडतंय?

Maharashtra News Live Update: फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील अजून एक तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT