Pune Saam tv
मुंबई/पुणे

Women's Day च्या पूर्वसंध्येला जीएसटी कार्यालयात खळबळ, 3 हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिका-यास पकडले

Pune : व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता. त्याला लाचेची मागणी करण्यात आली हाेती.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune Crime News :

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्य़ेला पुण्यातील जीएसटी कार्यालयातील एका महिला अधिका-यास लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे जीएसटी कार्यालयात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मालती रमेश कठाळे हिच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात कठाळे यांच्या विराेधात तक्रार दिली हाेती. व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता.

त्यासाठी व्यावसायिकाने अडीच हजार रुपये फी भरली होती. हे प्रकरण वर्ग-२ अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होते. कठाळे यांनी व्यावसायिकास कार्यालयात समक्ष बोलावून जीएसटी क्रमांकांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली हाेती. (Maharashtra News)

एसीबीने तक्रारी शहनिशा करुन सापळा रचला. जीएसटी महिला अधिकारी कठाळे हिला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT