Mumbai News Nivrutti Babar Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: लिंगायत समाजाचा विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर महामोर्चा; काय आहेत मागण्या?

लिंगायत समाजाचा आज मुंबईत राज्यव्यापी महामोर्चा आहे.

Ruchika Jadhav

निवृत्ती बाबर

Mumbai News: लिंगायत समाजाचा आज मुंबईत राज्यव्यापी महामोर्चा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी लिंगायत समाजाने आज महामोर्चाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हा मोर्चा सुरू झाला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्यात आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात असणारा लिंगायत समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करत आहे. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली या मागण्यांसाठी आजपर्यंत राज्यभर अनेक महामोर्चे झाले.मात्र सरकार लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पुढील टप्पा म्हणून आज आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा होत आहे.

आज होणाऱ्या महामोर्चामध्ये लाखो लिंगायत समाजाचे नागरिक सहभागी होणार आहेत, असे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने सांगितले आहे. गेल्या आठवडयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले तरी समितीने लेखी उत्तर मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवण्यास नकार दिला, त्यामुळें मुंबईत आजचा महामोर्चा घेण्याचा निर्धार केला आहे.

लिंगायताच्या समाजाच्या मागण्या काय आहेत?

  1. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या.

  2. राज्यातील लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा द्या.

  3. लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.

  4. मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे.

  5. विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करावा.

  6. राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम करावा.

  7. लिंगायत समाजातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह बांधून द्यावे.

  8. मिरज रेल्वे जंक्शनला जगतज्योती महात्मा बस्वेश्वर रेल्वे जंक्शन असे नाव द्यावे.

  9. प्रत्येक गावामध्ये लिंगायत रुद्रभूमी (स्मशानभूमी) साठी जागा उपलब्ध करून द्याव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT