राज्यपालांचा शिवसेनेला दणका, पालिकेत मंजूर झालेला प्रस्तावाच्या चौकशीसाठी लोकायुक्तांना पत्र  Saam TV
मुंबई/पुणे

राज्यपालांचा शिवसेनेला दणका, पालिकेत मंजूर झालेला प्रस्तावाच्या चौकशीसाठी लोकायुक्तांना पत्र

भाजपकडून (BJP) तक्रार आल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकाची आश्रय योजना चौकशीत फेऱ्यात सापडली असून त्यासाठी खुद्द राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीच लोकायुक्तांना पत्र पाठविले असून राज्यपालांची या योजनेची चौकशी करण्याची सूचना लोकायुक्तांना दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकाची आश्रय योजना चौकशीत अडकली आहे.

भाजपकडून (BJP) तक्रार आल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली आहे. सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आता पर्यंत 1 हजार 844 कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत (BMC) मंजूर झाले आहेत.

हे देखील पहा -

हे प्रस्ताव मंजूर होत असतानाच भाजपाने त्यावरती आक्षेप नोंदवला होता. मात्र भाजपच्या आक्षेपानंतरही तो प्रस्ताव मंजूर झाल्याने भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि राज्यपाल यांच्यातील वाद नव्याने पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin B12च्या कमतरेचं कारण काय? या ३ चुका आत्ताच टाळा, अन्यथा...

Sayaji Shinde Birthday : साऊथमध्ये डॅशिंग व्हिलन, मराठीत हुकमी एक्का; कोट्यवधींचे मालक असूनही सयाजी शिंदेंचे पाय जमिनीवरच

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; पगार १.७७ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नालासोप-यात मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली

Alepak Recipe : हिवाळ्यासाठी खास आयुर्वेदिक आलेपाक कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT