मुंबई : आज सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे भेट देणार आहेत, असे सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक परत एकदा चर्चेत आले आहेत. मलिकांच्या या ट्विटमुळे वेगळ्याच चर्चा रंगले आहेत.
पहा व्हिडिओ-
त्यांच्या घरी भेट देणारे पाहुणे म्हणजे नक्की कोण असणार आहेत. याविषयी तर्क- वितर्क लढवले जात आहेत. हे अधिकृत पाहुणे म्हणजे ईडी (ED) किंवा सीबीआयचे (CBI) अधिकारी तर नसणार का? अशा देखील चर्चा रंगत आहेत. पण या पाहुण्यांनी (guests) घरी भेट दिलीच तर त्यांचे मी स्वागत करणार असेही मलिक यांनी ट्विटमध्ये (tweet) सांगितले आहे.
नवाब मलिकांनी काही वेळाअगोदरच इंग्रजीत एक ट्विट केले आहे. यामध्ये ते सांगितले आहे की, 'माझ्या माहितीप्रमाणे काही अधिकृत पाहुणे उद्या सकाळी- सकाळी (morning) माझ्या घरी भेट देणार आहेत. पण मी त्यांच्या स्वागताकरिता चहा (Tea) आणि बिस्किटांसह तयार असणार आहे. जर त्यांना माझ्या योग्य पत्ता हवा असेल, तर त्यांनी मला फोन करावा' नवाब मलिक हे राज्याचे मंत्री असून राष्ट्रवादी कॉंग्रसेचे (NCP) नेते आहेत.
त्यांनी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्रावरुन रान उठवले होते. एकामागून एक कथीत पुराव्यांसह त्यांनी वानखेडे यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबियांवर आरोपांच्या फैरी सुरु केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये (politics) मोठी खळबळ उडाली होती. पण हे प्रकरण कोर्टापर्यंत (court) पोहोचल्यानंतर कोर्टाच्या सूचनेनुसार सध्या मलिकांनी आरोपांची मालिका थांबवली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.