Mumabi Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Mumabi Fire News: गोरेगावमधील इमारतीला भीषण आग; नागरिकांच्या किंकाळ्या, जीव वाचवण्यासाठी धावपळ

Goregaon News: इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली असून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडत आहेत. अन्य नागरिकांनी देखील ओरडून इमारतीतील नागरिकांना सावध करून खाली उतरण्याचे आवाहन केले.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Goregaon Fire News:

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर परिसरात आगीची मोठी घटना घडलीये. अस्मि कॉम्प्लेक्स इंडस्ट्रीमधील दोन गाळ्यांना आग लागलीये. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली असून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. आग लागल्याचे दिसून येताच अन्य नागरिकांनी देखील ओरडून इमारतीतील नागरिकांना सावध करून खाली उतरण्याचे आवाहन केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीच्या (Fire) घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून इमारतीतील सर्व नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळावर गोरेगाव पोलीस देखील दाखल झाले असून या ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांना इमारती जवळ जाण्यास रोखले जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

आग लागण्याचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले

मुंबईतील (Mumbai) अगीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचं दिसतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आग लागण्याचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले आहे. या वर्षी आगीच्या घटनांमध्ये आतापर्यंत ३३ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर २९० व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. आगीच्या घटनांचे आतापर्यंत ४,७२१ कॉल अग्निशमक दलाला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. साल २०२२ मध्ये आगीशी संबंधित ४,४१७ घटना घडल्या होत्या. यायामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला तर १६० जण जखमी झाले.

कारण काय?

या वर्षी लागलेल्या आगीच्या घटनांपैकी बहुतांश घटनांमध्ये शॉर्ट सर्किट हे महत्वाचं कारण आहे. त्यामुळे फायर ऑडिट प्रमाणे इलेक्ट्रिकल ऑडिट देखील महत्वाचं आहे. असं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. यासाठी मुंबई महापालीका अधिकाऱ्यांनी देखील सहमती दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT