GOREGAON HATHI CIRCLE HIDDEN BY BANNERS saam tv
मुंबई/पुणे

सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा! चमकोगिरीमुळे महत्त्वाचा लँडमार्कच अदृश्य

Goregaon West Hathi Circle Covered With Political Banners: गोरेगाव पश्चिमेतील प्रसिद्ध हत्ती सर्कल सध्या बॅनरबाजीमुळे झाकला गेला आहे. भावी नगरसेवकांच्या जाहिरातींमुळे महत्त्वाचा लँडमार्क अदृश्य झाल्याने नागरिकांनी अनधिकृत बॅनर हटवण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील महत्त्वाच्या ‘हत्ती सर्कल’वर सध्या बॅनरबाजीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. भाई, नाना, आप्पा अशा स्वतः ला टॅग लावून मिरवणाऱ्या बॅनर आणि भावी नगरसेवकांच्या जाहिरातींमुळे सर्कलवरील हत्तीच झाकला गेला आहे. त्यामुळे परिसराची ओळख असलेला हा महत्त्वाचा स्पॉटच नागरिकांना दिसेनासा झाला आहे. गोरेगाव पश्चिमेतील हत्ती सर्कल हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. या सर्कलपासून चार प्रमुख रस्ते फुटतात. तसेच मोतीलाल नगर परिसरात अनेक व्यावसायिकांची गोडावून असल्याने मुंबईसह बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांचीही या भागात मोठी वर्दळ असते.

परिसरात एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास ‘हत्ती सर्कल’ हा महत्त्वाचा लँडमार्क म्हणून सांगितला जातो. मात्र सध्या या सर्कलवर सर्वत्र बॅनर लावण्यात आल्याने प्रत्यक्ष हत्ती कुठे आहे, हेच शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे बाहेरून येणारे नागरिक आणि वाहनचालक गोंधळून जात असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, स्वतःला भावी नगरसेवक म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या इच्छुकांनी लावलेल्या बॅनरमुळे सार्वजनिक ठिकाणाचे विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राजकीय आणि वैयक्तिक प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे महत्त्वाचा लँडमार्क नाहीसा होतोय.

एका बाजूला मुंबई महापालिका अनधिकृत बॅनर आणि जाहिरातींवर कारवाई करत असल्याचे दिसते. मात्र गोरेगावच्या हत्ती सर्कलवरील या बॅनरबाजीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पालिकेने या ठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर तातडीने हटवावेत आणि हत्ती सर्कलचे मूळ स्वरूप पुन्हा स्पष्ट दिसेल, यासाठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT