Panvel Vasai Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Goods Train Accident: पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली, रेल्वे प्रवाशांचे होणार हाल

Railway news: पनवेल जवळ रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरली, रेल्वे प्रवाशांना बसणार मोठा फटका

Satish Kengar

Panvel- Vasai Train News:

एक मोठी बातमी समोर येत आहे. पनवेल वसई रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. कलंबोली ते पनवेल दरम्यान ही घटना घडल्याचं समजतं आहे. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून दिवाकडे जाणाऱ्या अप मार्गावर हा अपघात झाला. तर डाऊन लाईन (दिवा ते पनवेल) सुरक्षित आहे. अपघातात या मालगाडीचे चार डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अपघात झालेल्या मालगाडीच्या रुळावरून हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.   (Latest Marathi News)

अपघातामुळे या गाड्या थांबवण्यात आल्या

डाऊन ट्रेन

१५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली येथे थांबली

१२६१९ एलटीटी- मंगळुरु एक्सप्रेस- ठाण्यात थांबली

०९००९ मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा पंचानंद येथे थांबली

अप ट्रेन

२०९३१ कोचुवेली-इंदूर एक्सप्रेस- सोमठाणा येथे थांबली

१२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस-सोमठाणा येथे थांबली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT