Diwali Bonus Saam Tv
मुंबई/पुणे

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

Navi Mumbai Mahanagar Palika: नवी मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात साजर होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ४५००० रुपये बोनस मिळणार आहे.

Priya More
  • नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

  • सर्व कर्मचाऱ्यांना ४५ हजार रुपये दिवाली बोनस मिळणार

  • आशा स्वयंसेविकांनाही मिळणार ४५ हजार रुपयांचा बोनस

  • त्यामुळे नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे

नवी मुंबईच्या पालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी ४५,००० रुपयांचा सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यंदा त्यांची दिवाळी जास्त गोड होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरसकट ४५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी असा भेदभाव न करणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे जिथे सर्वांना समान बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांची यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते सागर नाईक यांनी दिवाळी बोनसबाबत प्रस्ताव सभागृहापुढे मांडला. युनियनकडून ४३,००० रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. पण यंदा सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उत्तमरीत्या साजरी व्हावी, यासाठी मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ४५,००० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सागर नाईक यांनी दिली.

मागच्या वर्षी नवी मुंबई महानगर पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना साधारण ३४,५०० रुपये बोनस दिला गेला होता. आशा स्वयंसेविकांना १८,५०० रुपये बोनस मिळाला होता. यंदा महानगर पालिकेने कोणताही भेदभाव न करता सर्वांना सरसकट ४५,००० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचा शरद पवारांना फोन; प्रकृतीची केली विचारपूस

Pension Rules : सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळाली, तर पूर्ण पगार अन् पेन्शन किती मिळणार? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Vastu Shastra: दररोज नकळत तुमच्याकडून होतायत या 4 चुका; घरात येते नकारात्मकता, वास्तुशास्त्राचे नियम वाचा

Sleeping After Heart Attack: डाव्या की उजव्या? हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर कोणत्या कुशीवर झोपणं ठरेल फायदेशीर?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! मुंबई-बंगळुरूनंतर आणखी एक स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार, कोणत्या शहराला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT