Kalyan Dombivli to Pali Bus Service Restarted google
मुंबई/पुणे

Kalyan Pali Bus : कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा; वेळापत्रक जाणून घ्या

Pali Bus Timetable: कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

चाकरमानी व पर्यटकांना गूड न्यूज बातमी

कल्याण-डोंबिवली-पाली बस सेवा सुरू

पालीत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत

अमित गवळे सकाळ वृत्तसेवा

सुधागड तालुक्यातल्या चाकरमानी, ग्रामस्थ आणि पर्यटकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण - डोंबिवलीपासून ते पालीपर्यंतच्या सेवा ८ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेचे पालीमध्ये आगमन होताच तिथल्या स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्यानी बसचं जल्लोषात जंगी स्वागत केलं.

स्वागताच्या वेळी उपस्थित शिवसेना जिल्हा समन्वयक रायगडचे राजेंद्र राऊत, तालुकाप्रमुख अनुपम कुलकर्णी, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागळे, शहर संपर्क प्रमुख विनायक जाधव, अवजड वाहतूक सेना प्रमुख शरद फोंडे, सुबोध पालांडे तसेच अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला, नागरिक आणि लहान मुलंही या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

पाली आणि सुधागड परिसर हा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर गणपती मंदिर , सुधागड आणि सरसगड किल्ला पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली भागातून मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. तसेच या भागातले बरेच नागरिक रोजगारासाठी कल्याण-डोंबिवली परिसरात जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही बस सेवा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत यांनी परिवहन मंत्र्यांकडे या बस सेवेची मागणी केली होती. त्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा प्रवास जास्त सोयीस्कर झाला आहे.

बसचे वेळापत्रक

  • कल्याण (विठ्ठलवाडी) येथून सुटण्याची वेळ: सकाळी ८.३० वाजता

  • पाली येथून परतीची वेळ : दुपारी १.३० वाजता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

SCROLL FOR NEXT