Namo Bharat Train to Boost Mumbai–Surat Travel Saam Tv
मुंबई/पुणे

Namo Bharat Train: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, मुंबई ते सूरत प्रवास होणार सुसाट, नमो भारत अन् वंदे मेट्रो लोकल धावणार

Namo Bharat Train to Boost Mumbai–Surat Travel: मुंबई ते सूरत आणि सूरत ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. हा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. कारण या मार्गावर आता नमो भारत अन् वंदे मेट्रो लोकल धावणार आहेत.

Priya More

Summary -

  • मुंबई–सूरतदरम्यान जलद रेल्वे सेवेला चालना मिळणार आहे

  • सूरत स्थानकावर दोन नवीन सबर्बन प्लॅटफॉर्म

  • नमो भारत आणि वंदे मेट्रो लोकल या मार्गावर धावणार

  • प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे

मयूर राणे, मुंबई

मुंबई महानगर प्रदेशाची उत्तरेकडे होत असलेली झपाट्याने वाढ आणि दक्षिण गुजरातमधील वाढता औद्योगिक रोजगार प्रवास पाहता भविष्यात मुंबई ते गुजरात दरम्यान सबर्बन लोकल सेवा सुरू होण्याच्या चर्चेला सूरत रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पामुळे नवे बळ मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पात दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म उभारले जात असल्याने भविष्यात मुंबई आणि गुजरात हे उपनगरीय रेल्वे नेटवर्कद्वारे जोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म?

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्मची उभारणी केली जाणार आहे. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची मर्यादा विरार आणि डहाणूपर्यंत असली तरी त्यापुढे वापी, वलसाड, नवसारी आणि सुरतपर्यंत मोठ्या प्रमाणावर दैनंदिन प्रवासी प्रवास करत आहेत. सुरतचा डायमंड उद्योग, टेक्सटाईल मार्केट, वापी- वलसाड औद्योगिक पट्टा तसेच मुंबईतील सेवा क्षेत्र यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे.

सबर्बन नेटवर्कमुळे प्रवास सुसाट होणार

विरार-सूरत नमो भारत आणि वंदे मेट्रो सध्या या मार्गावर मेमू आणि डेमू प्रकारातील काही गाड्या धावत असल्या तरी पूर्ण विकसित सबर्बन नेटवर्कसारखी वारंवार सेवा उपलब्ध नाही. याच पार्श्वभूमीवर सूरत स्टेशनवर उभारले जाणारे स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म हे भविष्यातील रेल्वेचे नियोजनात २०० ते ३०० किमी अंतरासाठी नमो भारत आणि वंदे मेट्रोसारख्या जलद शहरी रेल्वे सेवांवर भर दिला जात आहे. त्यानुसार विरार ते सूरतदरम्यान अशा आधुनिक सबर्बन सेवा सुरू होण्याची योजना आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT