Pune Metro  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे मेट्रो एअरपोर्ट आणि कोंढवा-येवलेवाडीपर्यंत धावणार; कसा आहे प्लान?

Good News for Punekars: पुण्याची मेट्रोचा लवकरच विस्तार होणार आहे. पुणे मेट्रो एअरपोर्ट आणि कोंढवा-येवलेवाडीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

Priya More

Summary -

  • पुणे मेट्रोचा विस्तार विमानतळ आणि कोंढवा-येवलेवाडी परिसरापर्यंत होणार आहे.

  • महा-मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

  • या मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास सोपा आणि जलद होईल.

  • हा मार्ग तयार झाल्यानंतर पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील मेट्रोचे नेटवर्क आणखी वाढणार आहे. पुणे मेट्रो लोहगाव येथील पुणे एअरपोर्ट आणि वेगाने विकसित होत असलेल्या कोंढवा-येवलेवाडी/उंड्री परिसराला नवीन मेट्रो कॉरिडॉरने जोडण्याची योजना आखत आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान आणि गारेगार होईल. त्याचसोबत त्यांची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होईल.

पुणे मेट्रोच्या या विस्तारांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महा-मेट्रोने निविदा मागवल्या होत्या. पहिल्या फेरीच्या छाननीनंतर आरवी इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लिमिटेड आणि आरआयटीईएस लिमिटेड या दोन कंपन्यांनी तांत्रिक टप्प्यात मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत या प्रोजेक्टसाठी आर्थिक बोली लावल्या जातील. सर्वात कमी रक्कम देणाऱ्या कंपनीला डीपीआर तयार करण्याचे काम मिळेल. हा अहवाल नवीन मार्गांचा नेमका मार्ग ठरवेल.

या मेट्रोसंदर्भात शेअर केले जाणारे नकाशे हे फक्त ढोबळ रेखाचित्रे आहेत. अंतिम संरेखन तपशीलवार अभ्यासानंतरच समोर येतील. जर हा प्रोजेक्ट नियोजनानुसार पुढे सरकला तर पुणेकरांना विमानतळापर्यंत प्रवास करणे अधिक सोपे होईल. त्याचसोबत कोंढवा आणि येवलेवाडीच्या वाढत्या निवासी क्षेत्रांसाठी मेट्रोची चांगली सुविधा मिळेल. या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

पुणे मेट्रो चालकविरहित रेल्वे सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. याची सुरूवात खडकवासला ते खराडी या प्रस्तावित मार्गापासून होईल असे देखील सांगितले जात आहे. महा-मेट्रोचे सिस्टीम्स अँड ऑपरेशन्स संचालक विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, पुणे मेट्रो लाईन-४ च्या मंजूर झालेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार मेट्रो लाईन्स अटेंडेड ट्रेन ऑपरेशन (एटीओ) मोडमध्ये चालवल्या जाणार आहेत ज्यामध्ये ट्रेन ऑपरेटर प्रत्येक ट्रेनमध्ये उपस्थित राहून एटीओ-आधारित कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोलच्या कामकाजाचे देखरेख करतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! 'पीएम किसान'चे ₹२००० तुम्हाला पैसे येणार का? अशा पद्धतीने करा चेक

India Tourism: शिमला-मनालीही विसरून जाल! डोंगर, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचं अप्रतिम मिश्रण, 'हे' हिल स्टेशन ठरेल स्वर्गीय अनुभव

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Bacchu Kadu : नाही तर सर्व रस्ते जॅम करु...बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

Tilkut Chutney Recipe : थंडीची चाहूल लागताच बनवा चटकदार तिळकूट चटणी, वाचा कोकणी स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT