Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! कल्याणीनगर ते पुणे एअरपोर्ट मेट्रो धावणार, वाहतूक कोंडी फुटणार; किती स्थानके असणार?

Good News For Punekar: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात लवकरच नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

Priya More
  • पुणे एअरपोर्टला जोडणारा कल्याणीनगर मेट्रो मार्ग मंजूर झाला.

  • या प्रकल्पामुळे विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार.

  • शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.

  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो नेटवर्कचा मोठा विस्तार होणार.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांचा आता मेट्रो प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार आहे. पुण्यात लवकरच नवीन मेट्रोमार्ग सुरू होणार आहे. पुणे विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मेट्रो प्रकल्पांबाबत निर्देश देण्यात आले आहेत. कल्याणीनगर ते पुणे एअरपोर्ट असा हा नवा मेट्रो मार्ग असणार आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणाऱ्या नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला असून कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या मेट्रो मार्गावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग थेट विमानतळाला जोडले जाणार आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आलामया मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याच्या सूचना मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या.

पुणेकरांचा प्रवास आता वाहतूककोंडी मुक्त आणि सुसाट होणार आहे. यामागचे कारण म्हणजे पुण्यामध्ये मेट्रोच्या जाळ्याचा विस्त होणार आहे. कल्याणीनगर ते पुणे विमानतळ नवा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक मार्गावर दुहेरी उड्डाणपूल कचरा डेपोपासून तयार केला जाईल. कर्वे रस्त्यावर उड्डाणपूलच नाही हे तर दुमजली उड्डाणपूल वनदेवीपर्यंततयार केला जाणार आहे. शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज मार्ग चांदणी चौक-वाकडपर्यंत नेण्यासाठी डिपीआर करण्याचेही निर्देश मोहेळकर यांनी दिले आहेत.

या बैठकीत पीसीएमसी–भक्ती शक्ती चौक मार्ग विस्तार, रामवाडी–वाघोली (विठ्ठलवाडी), खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला, नळ स्टॉप–वारजे–माणिकबाग तसेच हडपसर–लोणी काळभोर मेट्रो मार्गिकेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या सद्यस्थितीचाही आढावा मोहोळ यांच्याकडून घेण्यात आला. राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले की, ‘पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतुकीच्या गरजांना लक्षात घेता मेट्रोचा विस्तार अत्यंत आवश्यक असून गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडून आला आहे. नागरिकांचा मेट्रोकडे वाढता प्रतिसाद ही सकारात्मक बाब आहे.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'गेल्या काही वर्षांत पुणे शहरामध्ये विविध मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून अनेक नवीन मार्गांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. शहराच्या सर्व भागांना तसेच विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीकडे वाढता कल लक्षात घेता मेट्रो नेटवर्कचा विस्तार अत्यंत आवश्यक आहे. पुण्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना कामाचे आदेश दिले आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT