Good News For Pune Citizens bopodi chowk Khadki road open from 1st september 2023 Traffic Updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic News: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, बोपोडी-खडकी स्टेशनदरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी होणार खुला

Pune Traffic Latest News: वाहतूक कोंडीचा सामना करत असलेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Traffic Latest News: वाहतूक कोंडीचा सामना करत असलेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी चौकातून शिवाजीनगरकडे येणारा रस्ता येत्या १ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मेट्रोचं काम सुरू असल्याने बोपोडी ते खडकी (Pune News) स्टेशनदरम्यानचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. तसेच, रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. परिणामी या मार्गावरील शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक खडकी बाजारमार्गे वळविण्यात आली होती.

त्यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आरे चौकात येऊन पुढे जावे लागत आहे. या वाहतुकीमुळे बोपोडी, खडकी, औंध रस्ता ते पिंपरीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा (Pune Traffic) लागत होत्या. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, मेट्रोचे काम पूर्ण झाल्यामुळे बोपोडी चौकातून शिवाजीनगरकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून प्रशासनाकडे करण्यात येत होती. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका तसेच वाहतूक शाखेकडून प्रयत्न सुरू होते.

यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या समन्वयातून बैठका घेण्यात आल्या.मागील आठवड्यात संयुक्त पाहणी करून बोपोडी चौकातून शिवाजीनगरकडे येणारा रस्ता सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार हा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT