Pune Dam Water Level Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ८ दिवसांच्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरलं, पाण्याचं टेन्शन मिटलं

Pune Dam Water Level Today: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरलं. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

Priya More
  • पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे

  • खडकवासला धरण १०० टक्के भरलं

  • सलग आठ दिवसांच्या मुसळधार पावसानंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा

  • पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये एकूण सुमारे ५६ टक्के पाणीसाठा

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गेल्या ८ दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल झाले. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला. गेल्या ८ दिवस सतत पडणाच्या पावसामुळे पुण्यातील धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरलं. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठी धरणात जमा झाला आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या ८ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकवासला पाठोपाठ पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाल्यामुळे मात्र मागील वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये १३ टक्के कमी पाणीसाठा आहे. पण तरी देखील ८ दिवसांच्या पावसामुळे पुणेकरांचे पाणी टेन्शन मिटलं आहे.

कुठल्या धरणात किती पाणीसाठा?

खडकवासला: ९७.६० टक्के

पानशेत: ५९.६० टक्के

वरसगाव: ५३.४०

टेमघर: ३७.४६

दरम्यान, पुण्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अंधारबन ट्रेक पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सततच्या अतिमुसळधार पावसामुळे अंधारबन ट्रेक बंद ठेवण्याचा वन विभागाचा निर्णय आहे. अंधारबन भाग दरडी कोसळून दगड मातीने तसेच पाण्‍याच्‍या जोराच्‍या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ट्रेक मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. सध्या या परिसरात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच कोणताही पर्यटक अडकून पडलेला नसल्याची माहिती आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अंधारबन ट्रेक मार्ग पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

SCROLL FOR NEXT