सुरज सावंत
मुंबई: आपली एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याची आशाही आपण सोडून देतो. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २२ वर्षांनी पुन्हा मिळाली आहे. तुम्हालाही कदाचित हे ऐकून धक्का बसला असेल. कारण हा सुखद धक्का फॅशन ब्रॅन्ड चिरागउद्दीन च्या मालकाला बसला आहे. तब्बल २२ वर्षाआधी चोरी गेलेलं सोनं पोलिसांनी त्यांना परत केलं आहे. सध्या सोन्याची किंमत दीड कोटी रूपये इतकी आहे.
८ मे १९९८ मध्ये कुलाबातील अर्जून दस्वानीच्या घरी एका गॅंगने सोन्याची चोरी केली होती. आरोपींनी सिक्युरिटी गार्डला मारहाण केली आणि सेफच्या चाव्या हिसकावून घेतल्या होत्या. यानंतर गॅंगने दस्वानी आणि त्यांच्या पत्नीला बांधलं आणि मग चोरी केली.
१९९८ मध्येच गॅंगमधील चार आरोपींना पकडण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून चोरी केलेल्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. ट्रायलनंतर १९९९ मध्ये चौघांना सोडून देण्यात आलं. या प्रकरणात दोन आरोपी अजूनही फरार आहेत. २००२ मध्ये जो पर्यंत इतर दोन आरोपी मिळत नाही तो पर्यंत मुद्देमाल द्यायचा नाही असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले.
हे देखील पहा-
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना २००७ मध्ये अर्जन दस्वानी यांचं निधन झालं. त्यानंतर दस्वानी कुटुंबियांचेही याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून जप्त असलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासंदर्भात न्यायालयात पाठ पुरावा केला. न्यायालयाने परवानगी दिल्याानंतर पोलिसांनी राजू दस्वानी यांच्याशी पत्रव्यवहार केला. दस्वानींचे वकिल सुनिल पांडे म्हणाले की, कोर्टाचा हा आदेश ऐकून परिवाराला आनंद झाला. चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. परिवारातील सदस्यांचा भावना या वस्तूंसोबत जुळल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आहे. दरम्यान पोलिसांनी दस्वानी कुटुंबियांना त्याचे मौल्यवान दागिने परत केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.