Pegasus Spyware Deal: 'साबित हो गया! चौकीदार ही जासूस है'; मोठ्या खुलास्यामुळे काँग्रेस आक्रमक

हेरगिरी सॉफ्टवेअर असलेल्या पेगासस डीलबाबत न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकारने देशद्रोह केल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पीएम मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Pegasus Spyware Deal
Pegasus Spyware DealSaam Tv
Published On

स्पाय सॉफ्टवेअर पेगासस डीलबाबत (Pegasus Spyware Deal) न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालामुळे दिल्लीतील (Delhi) राजकीय तापमान कडाक्याच्या थंडीतही वाढले आहे. 5 राज्यांतील निवडणुकांपूर्वीच या खुलाशामुळे विरोधी पक्षांना सरकारवर हल्लाबोल करण्याचे जणू एक कारणच मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसने (Congress) पीएम मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला असून या खुलाशांवर पीएमओ काही उत्तर देणार का? हे पाहावं लागणार आहे.

पेगासस (Pegasus) डीलबाबत वृत्तसंस्था न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानंतर काँग्रेस केंद्र सरकारवर (Central Government) आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अहवालावर पीएमओने उत्तर दिलेच पाहिजे असा तग काँग्रेसने लावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, शक्ती सिंह गोहिल, श्रीनिवास बिवी यांनी याबद्दल ट्विट केले आहे की, बेरोजगारांसाठी 'नोकरी' कधी दरदरून लाठ्या-काठ्या खात होते, तेव्हा भारताचे पंतप्रधान पेगासस खरेदी आणि हेरगिरी करण्यात व्यस्त होते.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, भारताने संरक्षण करार म्हणून 2017 मध्ये इस्रायलकडून पेगासस विकत घेतला, त्यामुळे अशा प्रकारे हे सिद्ध झाले आहे की वॉचमनच हा गुप्तहेर आहे."

त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुद्धा या प्रकरणावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारने आमच्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, राज्याचे नेते आणि लोकांची हेरगिरी करण्यासाठी पेगासस विकत घेतला आहे. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधक, सेना, न्यायव्यवस्था या सर्वांनाच टार्गेट केले आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या तपास अहवालातून मोठा गौप्यस्फोट;

काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, न्यूयॉर्क टाइम्सच्या तपास अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की पीएम मोदींनी त्यांच्या 2017 दौऱ्यात इस्रायलकडून पेगासस विकत घेतला होता. हे स्पष्ट आहे की, भारताच्या शत्रूंप्रमाणेच मोदी सरकारने भारतीय पत्रकार, राजकीय नेते, सरकारी संस्थांच्या प्रमुखांविरुद्ध युद्धाचे हत्यार वापरले.

न्यूयॉर्क टाइम्सच्या या खुलाशावर आज दिल्लीत युवक काँग्रेस निदर्शने सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) काँग्रेस दोन्ही सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com