Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांनो काळजी घ्या, मेंदू व्हायरसचा प्रभाव झपाट्याने वाढतोय, रूग्णसंख्या ६७ वर

GBS Outbreak in Pune : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दररोज वाढ होताना दिसत आहे. रुग्णांची संख्या ६७ वर पोहचली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

Guillain Barre Syndrome: पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जी बी एस) या दुर्मिळ आजाराने धोक्याची घंटा वाजवली आहे. पुणे जिल्ह्यात ६७ रुग्ण आढळले असून, पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी भागात या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

आजाराची लक्षणं कोणती ?

गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण अशक्तपा आणि हातापायाला मुंग्या येणे हे आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये या आजाराची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिच लक्षणं दिसून आली आहेत.

पालिका आयुक्तांकडून पाहणी, उपाय योजना करण्याचे आदेश -

या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नांदेड गावात पाहणी केली. इथे असलेल्या विहिरीत शेवाळ चढलंय, याच विहीरीतून गावात पाणीपुरवठा केला जातो. महापालिका या विहिरीबाबत आणि या आजाराबाबत काय उपाययोजना करणे गरजेचे असणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त यांनी नविन समाविष्ट गावातील विहीरी, पाण्याच्या टाक्या व GBS आजाराने बाधित भागाची व आजाराने बाधित नागरिकांची त्यांचे घरी जाऊन, ऍडमिट असलेल्या हॉस्पिटल मद्ये जाऊन भेट घेवून पाहणी आणि चौकशी केली. आयुक्तांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश व सूचना संबंधित सर्व मनपा विभागास व नवीन समाविष्ट गावांचे अंतर्गत नियंत्रित ग्रामीण जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांस देण्यात आल्या.

धोका वाढला, काळजी घ्या -

गुलियन बॅरी सिंड्रोम (जी बी एस) चा धोका पुण्यात वाढताना दिसतोय. पुणे जिल्ह्यात ५९ रुग्णांमध्ये आणखी ७ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या आता ६७ वर गेली आहे. यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून जि बी एस रुग्‍णांची संख्‍या गुरुवारपर्यंत ६७ वर पोचली आहे. यामध्‍ये पुणे ग्रामीणमध्‍ये सर्वाधिक ३९, शहरात १३ पिंपरी चिंचवडमध्‍ये १२ तर ३ रुग्‍ण इतर जिल्ह्यांतील आहेत. जवळपास ८० टक्‍के रुग्‍ण हे खासगी रुग्‍णालयांत तर उरलेले २० टक्‍केच रुग्‍ण हे ससून या वैद्यकीय शिक्षण विभागाच्‍या सरकारी रुग्‍णालयात उपचार घेत आहेत.

डॉक्टरांनी काय सांगितले ?

गुलियन बॅरी सिंड्रोम पोस्ट वायरल आणि पोस्ट बॅक्टेरियल आजार आहे. हा जर 1916 पासून आढळतो. भारतातच नाही तर जगात सर्वत्र आढळतो. दुर्मिळ आजार असला तरीही धोकादायक आजार नाही. स्नायू दुखणे, गुडघे दुखणे या आजाराची प्राथमिक लक्षण आहे. शिवाय दूषित पाण्यामुळे ही आज आजार होऊ शकतो त्यामुळे पाणी गरम करून पिणे आणि उघड्यावरचं अन्न न खाणे, असा सल्ला सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. आराधना चव्हाण यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT