GBS Case Saam tv
मुंबई/पुणे

GBS Case Update: चिंता वाढली! जीबी सिंड्रोममुळे पुण्यात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा ४ वर

GBS outbreak: पुण्यात जीबी सिंड्रोम बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात जीबी सिंड्रोममुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

Priya More

जीबी सिंड्रोम आजाराने टेन्शन वाढवले आहे. पुण्यात जीबी सिंड्रोम आजारामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ वर्षीय तरुणाचा तर पुण्यातील नांदेड गावातील एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराने राज्यात आतापर्यंत ४ जणांचा बळी घेतले आहेत. त्यामुळे या आजाराची भीती वाढली आहे. पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

पुण्यात जीबी सिंड्रोम बाधित आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात या आजारामुळे तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नांदेडगावतील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून ससून रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. नांदेड गावातली या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात तिच्यावर उपचार सुरु होते.

प्रकृती अजून खालावत चालल्याचे पाहून कुटुंबाने महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज या महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत. त्यामधील या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला हा चौथ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये जीबी सिंड्रोम आजाराने पहिला बळी घेतला आहे. ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणावर २१ जानेवारीपासून वायसीएस रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात जीबी सिंड्रोमचे १३ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ५ रुग्ण हे बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जीबी सिंड्रोम आजाराला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्या भागात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत. त्या भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत असून ८ विभागात प्रत्येकी २ अशी १६ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत १० हजार ४३ घरे तपासली आहेत. दरम्यान या आजारावर पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

Petrol Diesel : देशातील 'या' शहरात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल, कारण काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले...

Budh Ast: 9 दिवसांत या राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; बुधाच्या अस्तामुळे येणार अच्छे दिन

Famous Singer Death: संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायकाचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT