Gautami Patil Viral News Instagram
मुंबई/पुणे

Gautami Patil Dance : सबसे कातील गौतमी पाटीलला धक्का; असं काय घडलं की मागावी लागली माफी, जाणून घ्या कारण

Gautami Patil Viral News : गौतमी नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. गौतमी आणि राडा याचं एक समिकरणच तयार झालं आहे.

रोहिदास गाडगे

Gautami Patil Shirur News: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील तरुणाईला गौतमी पाटीलने वेड लावलं आहे. गौतमीचा कार्यक्रम म्हटला की तुफान गर्दी आणि प्रचंड गर्दीचा माहोल असतो. तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. (Latest Marathi News)

गौतमी नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. गौतमी आणि राडा याचं एक समिकरणच तयार झालं आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुण मुलं हुल्लडपणा करताना दिसतात. आता पुन्हा एकदा गौतमीच्या एक कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. या कार्यक्रमस्थळी गौतमी दाखल झाली खरी मात्र तिला स्टेजवर डान्स करता आला नाही.

नेमकं प्रकरण काय?

शिरुर (Shirur) तालुक्यातील अन्नापुर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरुर पोलीसांनी (Police) ऐनवेळी परवानगी नाकारली. अखेर आयोजकांनी अनोखी शक्कल लढवत गौतमी पाटील ऐवजी हिंदवी पाटील या डान्सरच्या नावाने परवानगी काढली.

दरम्यान गौतमी कार्यक्रमस्थळी दाखल होऊनही तिला स्टेजवर डान्स करता आला नाही. अन्नापुर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र चार दिवसांपुर्वी अन्नापुर गावात दोन गटात वाद निर्माण झाला होता. (Pune News)

या वादाचे पडसाद गौतमीच्या कार्यक्रमात होऊ नये यासाठी शिरुर पोलीसांनी गौतमीच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली होती. कार्यक्रमस्थळी गौतमी पाटील येऊनही तीने डान्स केला नाही. मात्र यावेळी गौतमाचीने तिचा कार्यक्रम रद्द झालाबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच युवा वर्ग नाराज झाल्याने त्यांची माफी मागितली आणि पुढच्या कार्यक्रमाला नक्की डान्स करणार असे वचन दिले.

या वेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण पुढे करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

SCROLL FOR NEXT