Gautam Gaikwad Missing On Sinhagad Fort saamtv
मुंबई/पुणे

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Gautam Gaikwad Missing On Sinhagad Fort: सिंहगडावर आपल्या मित्रांसोबत फिराय़ला गेलेला गौतम गायकवाड अजूनही बेपत्ता आहे.मात्र तो बेपत्ता झाल्यानंतर समोर आल्यालेल्या सीसीटीव्हीत एक हुडी घातलेली व्यक्ती दिसल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. गौतमचं गूढ काय आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातलं पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सिंहगड. याच सिंहगडावर हैदराहबातमध्ये राहणारा गौतम गायकवाड आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला आणि तो परतलाच नाही. गेल्या चार दिवसांपासून गौतम गायकवाडचा पोलीस आणि वनखातं कसून शोध घेत आहे. मात्र त्याचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे गौतमच्या मृत्यूबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

सिंहगडावर नेमकं काय झालं?

गौतम गायकवाड बुधवारी आपल्या चार मित्रांसोबत सिंहगडावर गेला.

दिवसभर फिरल्य़ानंतर सर्व जण दुपारी 4.30 वाजता तानाजी कड्यावर गेले.

तिथून गौतम आपल्या मित्राकडे मोबाईल देऊन लघुशंका करण्यासाठी गौतम गेला तो परतलाच नाही.

त्यामुळे सर्व मित्रांनी त्याचा तानाजी कड्याजवळ शोध घेतला.

सिंहगडावरील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीशेजारील कड्यालगत त्याची चप्पल सापडली. मात्र त्याचा मागमूस लागला नाही.

मात्र एक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आणि या प्रकणात मोठा ट्विस्ट आला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गौतम बेपत्ता झाल्यानंतर दीड-दोन तासांनंतर एक हुडी घातलेली व्यक्त तोंड लपवत कारमधून पळताना दिसलीय. ही व्यक्ती गौतम आहे की दुसरं कोण याबाबत तपास सुरू आहे. मात्र यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. कारण गौतमवर सुमारे २० लाखांपेक्षा जास्त कर्ज होतं. याबाबत त्याला फोनही आले होते. त्यामुळे त्यानं मृत्यूचा बनाव तर केला नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय.

त्यामुळे गौतम गायकवाडचा अपघात झालाय की घातपात याचा तपास सुरू असतानाच सीसीटीव्हीतल्या हुडीवाल्या व्यक्तीमुळे या प्रकरणातला सस्पेनस् आणखीनच वाढवला. त्यामुळे गौतमचं गूढ कधी उलगडणार याचीच सर्वांना उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Horoscope: आयुष्यात घडतील आश्चर्यकारक गोष्टी; व्यवसायात दुप्पट प्रगती, वाढेल आदर,जाणून घ्या राशीभविष्य

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

SCROLL FOR NEXT