Gautam Adani Meets Sharad Pawar saam tv
मुंबई/पुणे

Gautam Adani: गौतम अदानींनी घेतली शरद पवार यांची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा? जाणून घ्या

Gautam Adani Meets Sharad Pawar: एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. अदानी आणि पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> आवेश तांदळे

Gautam Adani Meets Sharad Pawar:

एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. अदानी आणि पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिला आहे. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.

एकीकडे काँगेस आणि ठाकरे गट अदानी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अदानी ग्रुपला धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम दिल्याच्या विरोधात ठाकरे गटारे भव्य मोर्चा काढला होता. या मोर्च्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सामील झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकाराला लक्ष्य केले होते.  (Latest Marathi News)

ते म्हणाले होते की, मुंबईचा विकास दिल्लीतून होणार का? तसेच अदानींसाठी पालिकेत पालकमंत्र्यांचं ऑफिस देणारा का? उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ''हा लढा फक्त मुंबईसाठी नाही, राज्यासाठी आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर बसणार आहे. गदारांना खोके कोणी पोहचवले असतील हे आता तुम्हाला समजलं असेल. धारविकारांच्या गळा घोटणार जीआर काढला का?''

ठाकरे यांच्या मोर्च्यानंतर अदानी समूहाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. ज्यात मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प निष्पक्ष, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे अदानी समूहाला देण्यात आला. तसेच महाविकास आघाडी (MVA) सरकार सत्तेवर असताना निविदा अटींना अंतिम रूप देण्यात आले, असं सांगत आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Tea drinking habit: चहाचे शौकीन असाल तर 'ही' चूक अजिबात करू नका; कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधकांचं मत

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ९०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Women’s World Cup : ३ पराभवानंतरही संधी कायम, उपांत्य फेरीचं तिकिट कसं मिळणार? वाचा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT