Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षक चौक भागामध्ये गुंडाची गोळ्या झाडून घटना घडली आहे. आज सायंकाळच्या पावणे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील गुंडाची त्याच्या मित्रांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एकाच कारमध्ये प्रवास करताना त्याच्या मित्रांनी गुंड सागर शिंदेची हत्या केली आहे. घटनेतील मृत आरोपी २०१३ मध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी होता.
नेमकं काय घडलं?
योगेश जगताप आणि मृत सागर शिंदे यांचे पैशावरून वाद झाला होता. एकाच गाडीतून येताना दोघांमधील वाद विकोपाला गेला. आरोपी योगेश जगताप पहिली गोळी झाडली, तेव्हा जीव वाचविण्यासाठी मृत सागर शिंदे कारमधून उतरून पळत होता. त्याचवेळी आरोपीने त्याच्या पाठीत दुसरी गोळी झाडली. त्यानंतर शिंदे जागीच ठार झाला.
आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सिनेस्टाईल घडलेल्या या घटनेच्या थरारामुळे पिंपरी चिंचवड हादरले आहे. मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने या हत्येच्या घटनेत कोण कोण सहभगी आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपीला अटक
गुंड विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांच्या पथकाने गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी योगेश जगतापला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.