GSB Ganpati Saam Tv
मुंबई/पुणे

GSB Ganpati: मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती, GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटींचा विमा

Priya More

गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईतील अनेक मानाच्या आणि मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. मुंबईमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडाळाच्या गणपतीची ओळख आहे.

जीएसबीच्या गणपतीची नेहमीच चर्चा होत असते. या मंडळाचा गणपती बाप्पा मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या बाप्पाची सर्व आभूषणं सोन्या-चांदीची असतात. जीएसबी गणेशोत्सव मंडळाने या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा काढल्याची बातमी समोर आली आहे. या विम्याची किंमत ४००.५९ कोटी रुपये आहे.

जीएसबी सेवा मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जीएसबीचा राजा हा गणपती मुंबईतील लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. हे गणेशोत्सव मंडळ मुंबईतल्या किंग सर्कल येथे आहे. या गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा पाच दिवसांचा असतो. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा या गणेशोत्सव मंडळाने ४०० कोटी रुपयांचा विक्रमी विमा काढला आहे. या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, स्वयंपाकी, सेवा कर्मचारी, पार्किंग आणि सुरक्षा कर्मचारी, स्टॉल कामगार यांचाही या विम्यामध्ये समावेश असेल.

याशिवाय इतर विविध पॉलिसींच्या आधारे या बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त हे गणेशोत्सव मंडळ सोन्या-चांदी, चोरी आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध विमा पॉलिसी देखील खरेदी करते. जीएसबी सेवा मंडळ यावर्षी आपला ७० वा वार्षिक गणेशोत्सव साजरा करत आहे. ७ ते ११ सप्टेंबर या ५ दिवसांच्या उत्सवासाठी या गणेशोत्सव मंडळाने ४००.५९ कोटींचा विमा काढला आहे. ५ दिवसांच्या या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मोठी गर्दी करतात.

महत्वाचे म्हणजे, २०२३ मध्ये या गणेशोत्सव मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा काढला होता. ५ दिवसांच्या गणेश उत्सवादरम्यान दिवसाला २० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात जीएसबीच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी १ लाखांहून अधिक भाविक येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT